Join us  

वादंग सुरूच! विराटने 'अनफॉलो' केल्यानंतर 'दादा' संतापले; गांगुलीनेही दिलं जोरदार प्रत्युत्तर 

Virat Kohli vs Sourav Ganguly : विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यातील वाद सोशल मीडियावर उफाळून आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 4:03 PM

Open in App

Sourav Ganguly UNFOLLOWS Virat Kohli । नवी दिल्ली : विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यातील वाद सोशल मीडियावर उफाळून आला आहे. माहितीनुसार, भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने काल बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केले होते. यानंतर आता गांगुलींनी देखील विराटला अनफॉलो केल्याचे समजते. खरं तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यापूर्वी हे दोघेही एकमेकांना फॉलो करत होते. 

दरम्यान, दिल्ली आणि बंगळुरू यांच्यातील सामन्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. सामन्यानंतर विराट आणि गांगुली यांना एकमेकांना हस्तांदोलन केले नसल्याचे पाहायला मिळाले. याला चाहते कर्णधारपदाच्या वादासोबत जोडत आहेत. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२१ नंतर अंतर्गत वादामुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर वन डे क्रिकेटच्या कर्णधारपदावरून त्याला हटवण्यात आले.

विराट कोहली-सौरव गांगुली वाद; गोष्टी कशा सुरू झाल्या?दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने विराट कोहलीला भारताच्या वन डे कर्णधारपदावरून हटवल्यानंतर गांगुली-कोहली वाद सुरू झाला. या निर्णयामुळे विराट नाराज झाला होता आणि एका ज्वलंत पत्रकार परिषदेत त्याने काही धाडसी दावे केले होते. विराटने सांगितले की, बीसीसीआयने वन डे नेतृत्वातील बदलाबाबत कोणतीही चर्चा केलेली नाही आणि त्याला फोन कॉलवर संघ रवाना होण्याच्या काही तासांपूर्वीच याबद्दल माहिती देण्यात आली होती. कोहलीच्या शब्दांनी गांगुलीच्या दाव्याचे खंडन केले की त्याने विराट कोहलीला ट्वेंटी-२०चे कर्णधारपद सोडू नये कारण बोर्डाला विभाजित कर्णधारपद नको आहे. गांगुली म्हणाला की, विराट कोहलीने भारताच्या ट्वेंटी-२०च्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याने बोर्डाने त्याला वन डे कर्णधारपदावरून काढून टाकले आणि रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :विराट कोहलीसौरभ गांगुलीबीसीसीआयरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरदिल्ली कॅपिटल्स
Open in App