Mumbai’s squad for Ranji Trophy knockouts : महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) याचे इंडियन प्रीमिअर लीगमध्ये पदार्पण काही झाले नाही. आयपीएल २०२१मध्ये बाकावर बसवून ठेवल्यानंतर यंदातरी मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) अर्जुनला पदार्पणाची संधी देतील असे अखेरच्या साखळी सामन्यापर्यंत वाटत होते. पण, अर्जुनच्या मागून आलेल्या हृतिक शोकिन, कुमार कार्तिकेय आदी युवा खेळाडूंनी आयपीएल २०२२मध्ये MI कडून पदार्पण केले. आता आयपीएल २०२३ मध्ये तरी त्याला संधी मिळतेय का देव जाणे... अशात अर्जुनला आणखी एक धक्का देणारी बातमी समोर आली आणि ती म्हणजे मुंबईच्या रणजी संघातून त्याचे नाव वगळण्यात आले आहे.
रोहित शर्माने आयपीएल २०२२मध्ये २२ वर्षीय अर्जुनवर एका सामन्यासाठीही विश्वास दाखवला नाही. आता रणजी करंडक स्पर्धेच्या बाद फेरीसाठी निवडलेल्या मुंबईच्या संघातूनही त्याला वगळण्यात आले आहे. पृथ्वी शॉ उत्तराखंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीत मुंबईचे नेतृत्व करणार आहे. रणजी करंडक स्पर्धेसाठी आधी जाहीर केलेल्या संघात अर्जुनचे नाव होते, परंतु त्याला एकाही सामन्यात खेळवले गेले नाही. बाद फेरीसाठी निवडलेल्या संघात अर्जुनच्या जागी सर्फराज खानचा भाऊ मुशीर खान याची निवड झाली आहे.
मुंबईचा संघ ( Mumbai’s squad for Ranji Trophy knockouts) - पृथ्वी शॉ ( कर्णधार), यशस्वी जैस्वाल, भुपेन लालवानी, अरमान जाफर, सर्फराज खान, सुवेद पारकर, आकर्षित गोमेल, आदित्य तरे, हार्दिक तामोरे, अमन खान, साईलाज पाटील, शाम्स मुलानी, ध्रुमील मातकर, तनुष कोटियान, शशांक आतार्डे, धवल कुलकर्णी, तुषार देषपांडे, मोहित अवस्थी, रॉयस्टन डाएस, सिद्धार्थ राऊत, मुशीर खान ( Prithvi Shaw (captain), Yashasvi Jaiswal, Bhupen Lalwani, Arman Jaffer, Sarfaraz Khan, Suved Parkar, Aakarshit Gomel, Aditya Tare, Hardik Tamore, Aman Khan, Sairaj Patil, Shams Mulani, Dhrumil Matkar, Tanush Kotian, Shashank Attarde, Dhaval Kulkarni, Tushar Deshpande, Mohit Awasthi, Roystan Dias, Siddharth Raut, Musheer Khan.)
Web Title: After warming Mumbai Indians bench for two IPL seasons, Arjun Tendulkar ignored for Mumbai’s squad for Ranji Trophy knockouts
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.