Join us  

या खेळाडूने केला सामना जिंकल्यावर ' नागीन डान्स '

श्रीलंकेत सध्या निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेत एका खेळाडूने संघाला सामना जिंकून दिल्यावर चक्क ' नागीन डान्स ' करत आपल आनंद व्यक्त केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2018 4:05 PM

Open in App

कोलंबो : ' नागीन डान्स ' हा भारतीयांसाठी काही नवीन नाही. बऱ्याच वर्षांपूर्वी बॉलीवूडमधील एका गाण्यापासून हा डान्स सुरु झाला आणि या डान्सने अजूनही लोकांवर भूरळ पाडलेली आहे. श्रीलंकेत सध्या निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेत एका खेळाडूने संघाला सामना जिंकून दिल्यावर चक्क ' नागीन डान्स ' करत आपल आनंद व्यक्त केला. पण त्याने हा डान्स का केला, यालाही कारण आहे.

शनिवारी श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यामध्ये ट्वेन्टी-20 लढत सुरु होती. खेळाडू काही वेळा मैदानात एकमेकांवर स्लेजिंग करतात. तसेच श्रीलंकेच्या दनुष्का गुणतिलकाने बांगलादेशच्या मुशफिकर रहिमकडे पाहून त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गुणतिलकाने रहिमचे लक्ष विचलित करण्यासाठी ' नागीन डान्स 'सारखे हावभाव केले. 

या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 214 धावांचा डोंगर  उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना रहिमने श्रीलंकेच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच प्रहार करायला सुरुवात केली. रहिमने 35 चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद 72 धावांची खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला.

बांगलादेशला सामना जिंकण्यासाठी अखेरच्या षटकात 9 धावांची गरज होती. रहिमने बांगलादेशची बाजी भक्कमपणे सांभाळली होती. रहिमने फटकेबाजी करत बांगलादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विजयी फटका मारल्यावर रहिमने विजयाचा आनंद साजरा केला. पण गुणतिलकाने आपल्याला कसे डिवचले, हे तो विसरला नव्हता. त्यामुळे श्रीलंकेचा गोलंदाज थिसारा परेराच्या समोर जाऊन रहिमने ' नागीन डान्स ' केला आणि प्रेक्षकांचे मनोरंजन झाले. पण समाजमाध्यांवर मात्र रहिमची जोरदा खिल्ली उडवली गेली.

टॅग्स :निदाहास ट्रॉफी २०१८क्रिकेट