Join us  

थांबा, विचार करा आणि मग पुढे जा! धोनीचा दाखला देत मुंबई पोलिसांकडून जनजागृती

रवींद्र जडेजाने अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकून चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 3:52 PM

Open in App

मुंबई : आयपीएल २०२३ च्या फायनलच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गतविजेत्या गुजरात टायटन्सचा पराभव करून पाचव्यांदा स्पर्धेचा किताब पटकावला. रवींद्र जडेजाने अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकून चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. चेन्नईला अखेरच्या षटकात १३ धावांची आवश्यकता होती. १३ धावांचा बचाव करण्यासाठी हार्दिक पांड्याने मोहित शर्माकडे चेंडू सोपवला. मोहितने पहिल्या ४ चेंडूत ४ धावा दिल्या पण अखेरच्या २ चेंडूंनी सामन्याचा निकाल बदलला. पाचव्या चेंडूवर जडेजाने षटकार ठोकला तर अखेरच्या चेंडूवर चौकार गेला अन् गतविजेत्यांना ट्रॉफीचा बचाव करण्यात अपयश आले.

मुंबई पोलिसांची खास पोस्ट चेन्नईच्या विजयानंतर धोनीचे समर्थक सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. अशातच मुंबई पोलिसांनी देखील चेन्नईच्या कर्णधाराचे कौतुक करताना एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये माही एका ट्रॅफिक सिग्नलसमोर उभा असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्याच वेळी, ट्रॅफिक सिग्नलमध्ये हिरवा, पिवळा आणि लाल या तीन रंगांऐवजी काही मनोरंजक इमोजी दिसत आहेत. 

"...अखेर १३-१४ तासांची झोप मिळाली", CSK नं 'गड सर' करताच ऋतुराजनं चाहत्यांचं मानलं आभार

लाल रंगामध्ये हार्टची इमोजी दिसत आहे, चेन्नईची जर्सी पिवळ्या सिग्नलमध्ये आहे. तर हिरव्या सिग्नलमध्ये खेळाडू फलंदाजी करत असल्याचे दाखवण्यात आले. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे, "थांबा, विचार करा आणि मग पुढे जा". चॅम्पियन नेहमीच नियमांनुसार खेळतात आणि कधीही सिग्नल तोडत नाहीत.

चेन्नईचा 'पाचवा' पराक्रमगुजरात टायटन्सला अखेरच्या चेंडूवर पराभूत करून धोनीच्या चेन्नईने पाचव्यांदा आयपीएलचा किताब उंचावला. अखेरच्या षटकांतील शेवटच्या २ चेंडूवर १० धावांची गरज असताना रवींद्र जडेजाने अनुभवाचे कौशल्य दाखवले. मोहित शर्माच्या पाचव्या चेंडूवर षटकार ठोकून त्यानं चाहत्यांना जागं केलं. तर, अखेरचा चेंडू जड्डूच्या पायाला लागून सीमीरेषेकडं गेला अन् चेन्नईच्या खेळाडूंसह चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

टॅग्स :आयपीएल २०२३महेंद्रसिंग धोनीमुंबई पोलीसचेन्नई सुपर किंग्सवाहतूक पोलीस
Open in App