Join us  

Rohit Sharma : रोहित शर्माची टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती? 'या' पोस्टनं अचानक उडवून दिली खळबळ!

ही पोस्ट पाहिल्यानंतर, चाहत्यांना अक्षरशः धक्का बसला आणि हे काय आणि कसे घडले? रोहित शर्मा अशी अचानकपणे कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा कशी करू शकतो? असे प्रश्न त्यांना पडले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 2:45 PM

Open in App

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) अंतिम सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर, सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टने क्रिकेट प्रेमींमध्ये खळबळ उडवून दिली. खरे तर, सोशल मीडियावर एक पोस्ट जबरदस्त व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या पराभवानंतर रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली, असे लिहिले आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर, चाहत्यांना अक्षरशः धक्का बसला आणि हे काय आणि कसे घडले? रोहित शर्मा अशी अचानकपणे कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा कशी करू शकतो? असे प्रश्न त्यांना पडले. 

रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? -खरे तर, या पोस्टसंदर्भात मोठा खुलासा झाला आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, चाहत्यांनाही वाटले की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या पराभवानंतर, रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली, मात्र, सत्य तर काही वेगळेच आहे. खरे तर, सोशल मीडियावर वेगाने वायरल होत असलेली ही पोस्ट फेक आहे. ही पोस्ट ट्विटरच्या @ImR0hitt45 या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. रोहित शर्माचे ऑफिशियल ट्विटर हँडल @ImRo45 हे आहे. याचाच अर्थ रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमधून कसल्याही प्रकारची निवृत्ती घेतलेली नाही.

या पोस्टमुळे अचानक उडाली खळबळ -या फेक अकाऊंटवरून शेअर केलेल्या या पोस्टमुळे अचानक खळबळ उडाली आहे. रोहित शर्माच्या कर्णधारपदाबद्दल बोलायचे झाल्यास, भारताने सलग दुसऱ्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी गमावली. 2022 च्या टी-20 विश्वचषकानंतर आता टीम इंडियाने 2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ट्रॉफी जिंकण्याची संधीही घालवली आहे. 

रोहित शर्माने 26 एकदिवसीय सामन्यांमध्ये नेतृत्व केले. यांपैकी 19 सामन्यात त्याने भारताला विय मिळवून दिला आहे. तसेच, त्याने 51 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करताना टीम इंडियाला 39 सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. 

टॅग्स :रोहित शर्माट्विटरभारतीय क्रिकेट संघ
Open in App