लंडन : फलंदाजांना अनुकूल खेळपट्ट्यांवर इंग्लंड संघ ५०० धावा फटकावणार, असे अंदाज बांधले जात असले तरी यजमान संघाचे लक्ष मात्र सोमवारी पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या विश्वचषक लढतीतील विजयावर केंद्रित झाले आहे. इंग्लंडने एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोनवेळा सर्वाधिक धावांचा विक्रम नोंदवला आहे. प्रथम पाकिस्तानविरुद्ध २०१६ मध्ये ३ बाद ४४४ धावा केल्या, तर गेल्या वर्षी याच खेळपट्टीवर त्यांनी ६ बाद ४८१ धावा फटकावल्या. दुसऱ्या बाजूचा विचार करता पाकिस्तानच्या फलंदाजांना नॉटिंगहॅममध्ये गेल्या लढतीत विंडीजच्या वेगवान गोलंदाजांच्या उसळत्या चेंडूंना यशस्वीपणे तोंड देता आले नाही. त्यांचा डाव १०५ धावात संपुष्टात आला.
इंग्लंडने सलामीला दक्षिण आफ्रिकेला १०४ धावांनी लोळवले. त्या लढतीत भेदक ठरलेला जोफ्रा आर्चर आखूड टप्प्याच्या माºयाने पाकच्या फलंदाजांन अडचण होऊ शकतो. त्याच्यासोबत मार्क वुडचा संघात समावेश करण्यात आला आहे. इंग्लंडचे सहायक प्रशिक्षक ग्राहम थोर्प म्हणाले, ‘आम्ही पाक-विंडीज लढत बघितली. कॅरेबियन संघाने चांगला मारा केला. ते बघूनच आम्ही वुडचा संघात समावेश केला.’ या सत्राच्या सुरुवातीपासून आतापर्यंत वुडने केवळ १३.१ षटके गोलंदाजी केली आहे. कारण त्याची टाचेची दुखापत पुन्हा उफाळण्याचा धोका होता. थोर्प पुढे म्हणाले, ‘आम्ही जास्तीत जास्त धावा फटकावण्यासाठी प्रयत्नशील आहोत, पण कुठला आकडा निश्चित केलेला नाही. आव्हानात्मक धावसंख्या उभारणे आवश्यक आहे.’ गेल्या ११ सामन्यात पराभव स्वीकारणाºया पाकिस्तान संघाला इंग्लंडने मालिकेत ४-० ने पराभूत केले होते.
Web Title: Again England's tough test against Pakistan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.