ग्रॅमी स्मिथ लिहितात...
दक्षिण आफ्रिका संघ विश्वचषकातील स्वत:च्या वाटचालीकडे आता वेगळ्या नजरेने पाहात आहे. आतापर्यंत निकाल विरोधात गेले. फलंदाजी सपशेल अपयशी ठरली. महत्त्वाचे खेळाडूदेखील दुखापतींनी त्रस्त आहेत. अशा गोष्टींमुळे कोणत्याही संघाची मोहीम फसू शकते. यानंतरही सर्वांचे लक्ष वेधले ते निवडीसाठी उपलब्ध असल्याचे सांगूनही डिव्हिलियर्सला संघात स्थान मिळू न शकल्याच्या मुद्यानेच...
द. आफ्रिकेपुढे विश्वचषकात टिकून राहण्याचे आव्हान आहे. संघावर दडपण आहे, ते खेळाडूंच्या चेहऱ्यांवर दिसणार नाही, हे देखील शक्य नाही. द. आफ्रिकेने विंडीजविरुद्ध चूक करू नये. सराव असो वा संघ निवड, काय करायचेय, याबाबत स्पष्ट दृष्टिकोन असायलाच हवा.
भारताविरुद्ध ख्रिस मॉरिस आणि कासिगो रबाडा यांच्या नेतृत्वात गोलंदाजांनी सुरेख कामगिरी केली. पण फलंदाजांना आता जबाबदारीने खेळण्याची गरज असेल. वेस्ट इंडिजची ताकद प्रतिस्पर्धी संघाची घसरगुंडी करणारी गोलंदाजी आहे. शेल्डन कॉटरेल, ओशाने थॉमस आणि आंद्रे रसेल हे अत्यंत धोकादायक गोलंदाज आहेत. विंडीजचे खेळाडू खेळाचा आनंद घेत अनेकांना प्रभावित करतात. अशावेळी आफ्रिकेचा प्लान बी काय असेल? मी आपल्या संघाला विचार करण्याची विनंती करतो.द. आफ्रिकेने सुरुवात चांगली केली शिवाय विकेट राखून ठेवल्यास याचा लाभ मधल्या षटकात धावा काढण्यासाठी होईल. सुरुवातीला ८० धावात अर्धा संघ गमविल्यानंतरही आॅस्ट्रेलियाने विंडीजच्या माºयातील विविधतेच्या अभावाचा मोठा लाभ घेतला.विंडीजही सामना जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे. नॅथन कुल्टर-नाईल आणि स्टीव्ह स्मिथ यांनी ज्या पद्धतीने फटकेबाजी केली त्यापासून द. आफ्रिकेने विंडीजविरुद्ध प्रेरणा घ्यायला हवी. एक गोष्ट तितकीच खरी की आॅस्ट्रेलिया ज्या व्यावसायिकपणे क्रिकेट खेळते, ते आंतरराष्टÑीय क्रिकेटला हवे आहे. त्यांचे खेळाडू काहीही करू शकतात. द. आफ्रिकेसाठी ही लढत मुळीच सहजसोपी असणार नाही.