T20 World Cup, AFG vs SCO : राष्ट्रगीत वाजताच Afghanistan चे प्लेयर्स झाले भावूक, साहसाचं कौतुक; पाहा Video

T20 World Cup, AFG vs SCO : सध्या Afghanistan मध्ये Taliban चं शासन आहे. त्यांनी देशात सध्या शरिया कायदा आणि तालिबानी झेंडा लागू केला आहे. अशातच अफगाणिस्तानच्या संघाचा निर्णय सहसी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 12:07 PM2021-10-26T12:07:57+5:302021-10-26T12:09:26+5:30

whatsapp join usJoin us
aghanistan vs scotland t20 2021 world cup match mohammad nabi breaks down during national anthem | T20 World Cup, AFG vs SCO : राष्ट्रगीत वाजताच Afghanistan चे प्लेयर्स झाले भावूक, साहसाचं कौतुक; पाहा Video

T20 World Cup, AFG vs SCO : राष्ट्रगीत वाजताच Afghanistan चे प्लेयर्स झाले भावूक, साहसाचं कौतुक; पाहा Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देअफगाणिस्तानच्या या सहसी निर्णयाचं करण्यात येतंय कौतुक.

T20 World Cup AFGHANISTAN V SCOTLAND  अफगाणिस्ताननं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात स्कॉटलंड संघावर दणदणीत विजय मिळवला. Round 1 मध्ये धक्कादायक निकालाची नोंद करणारा स्कॉटलंड कडवी झुंज देईल असे अपेक्षित होते.परंतु अफगाणिस्तानं त्यांची हवाच काढली. फलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर अफगाणिस्तानच्या Mujeeb Ur Rahman यानं विक्रमी कामगिरी केली. परंतु या सामन्यादरम्यान अशी एक घटना घडली ज्यामुळे अफगाणिस्तान संघातील खेळाडूंसह चाहत्यांच्याही डोळ्यात अश्रू आले. 

अफगाणिस्तानच्या संघानं साहस दाखवत अफगाणिस्तानचा झेंडा फडकावला आणि अफगाणिस्तानचं राष्ट्रगीतही गायलं. यादरम्यान संघातील प्रत्येक खेळाडूच्या प्रामुख्यानं संघाचा कर्णधार मोहम्मद नबीच्या डोळ्यात अश्रू दिसून आले. ट्विटरवर याचा एक व्हिडीओदेखील शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये मोहम्मद नबी आपले अश्रू पुसताना दिसत आहे. 

सालेह यांनीदेखील व्हिडीओ केला रिट्वीट
अफगाणिस्तानचे माजी उप-राष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनीदेखील हा व्हिडीओ रिट्वीट केला आहे. "मी आपल्या क्रिकेट हिरोंच्या साहसाला आणि आमच्या राष्ट्रीय मूल्यांप्रती त्यांच्या समर्पणाला सलाम करतो. त्यांनी राष्ट्रगीत गायलं आणि पाकिस्तान समर्थित तालिबानी दहशतवादी अत्याचाराच्या विरोधात आमचा राष्ट्रध्वज फडकावला. तालिबान शासनाकडे आवाज नाही, त्यांच्याकडे विना सीव्ही आणि मूक पंतप्रधान आहे," असंही सालेह म्हणाले.

 
१९१ धावांचं आव्हान
प्रथम फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्ताननं २० षटकांत ४ बाद १९० धावा कुटल्या. हझरतुल्लाह झझाई व मोहम्मद शाहजाज यांनी अफगाणिस्तानला दमदार सुरुवात करून दिली. शाहजाद २२ धावा करून माघारी परतला. त्यानंतर रहमनुल्लाह गुर्बाज यानं झझाईला सॉलिड साथ दिली. झझाईनं ३० चेंडूंत ३ चौकार व ३ षटकार खेचून ४४ धावांवर माघारी गेला. गुर्बाजनं ३७ चेंडूंत १ चौकार व ४ षटकार खेचून ४६ धावांवर बाद झाला. नजिबुल्लाह झाद्रान यानं वादळ आणलं. त्यानं ५ चौकार व ३ षटकार खेचून ३४ चेंडूंत ५९ धावा चोपल्या. कर्णधार मोहम्मद नबी ४ चेंडूंत ११ धावांवर नाबाद राहिला. अफगाणिस्तानच्या संघानं स्पर्धेत  एका डावात सर्वाधिक ११ षटकार खेचले.

Web Title: aghanistan vs scotland t20 2021 world cup match mohammad nabi breaks down during national anthem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.