वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयश झटकून टीम इंडियानं त्यानंतर झालेल्या बारापैकी 11 मालिका जिंकल्या, एक मालिका बरोबरीत सुटली. पण, याच दरम्यान टीम इंडियाच्या काही प्रमुख खेळाडूंना दुखापतही झाली. जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार हे चार प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे काही काळ मैदानाबाहेर होते. बुमराह आणि धवन यांनी पुनरागमन केले खरे, परंतु पुन्हा दुखापत झाल्यानं धवननं न्यूझीलंड दौऱ्यातून माघार घेतली. सध्या बुमराहचं तंदुरुस्त होऊन मैदानावर परतला आहे, पण त्याचा फॉर्म कुठेतरी हरवल्याचे दिसत आहे.
जगातला सर्वात खतरनाक गोलंदाज म्हणून बुमराह ओळखला जातो. त्यात डेथ ओव्हमध्ये प्रतिस्पर्धी फलंदाजांची त्याचा सामना करताना चांगलीच दमछाक झालेली अनेकदा पाहायला मिळाली आहे. पण, हॅमिल्टन येथे झालेल्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात याच बुमराहला सुपर ओव्हरमध्ये किवी फलंदाजांनी झोडपले. कर्णधार विराट कोहलीनं मोठ्या विश्वासानं त्याच्याकडे चेंडू सुपूर्द केला. पण, केन विलियम्सन आणि मार्टिन गुप्तीलनं त्याच्या सहा चेंडूवर 17 धावा चोपल्या. डेथ ओव्हरमध्ये बुमराहची ती आतापर्यंतची सर्वात महागडी ओव्हर ठरली.
सुपर ओव्हरचे महागडे षटक4 धावा विरुद्ध गुजरात लायन्स, राजकोट 20178 धावा विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, मुंबई 201917 धावा विरुद्ध न्यूझीलंड, हॅमिल्टन 2020
वर्ल्ड कप स्पर्धेनंतर बुमराह वेस्ट इंडिज दौऱ्यावर वन डे व कसोटी मालिकेत खेळला, परंतु तेथे त्याला दुखापत झाली आणि तो बराच वेळ क्रिकेटपासून दूर राहिला. आजच्या सामन्यात त्याला विश्रांती देण्याचा विचार आहे. हॅमिल्टनमध्ये बुमराह सर्वात महागडा गोलंदाज ठरला होता. वन डे आणि कसोटी संघात सहभाग निश्चित असल्यानं त्याच्यावरील भार पाहता त्याला आज विश्रांती दिली जाऊ शकते.
बुमराहनं 2020 मधील पहिल्याच मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक केले. श्रीलंकाविरुद्धच्या तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेत तो खेळला. त्यानंतर तो न्यूझीलंडमध्ये तीन ट्वेंटी-20 सामने खेळला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. पाच ट्वेंटी-20 सामन्यांत बुमराहला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. दुखापतीतून कमबॅक करणाऱ्या बुमराहचा फॉर्म हरवल्याचे दिसत आहे. बुमराहनं मागील पाच ट्वेंटी-20 सामन्यांत केवळ चार विकेट्स घेतल्या आहेत. त्यात त्यानं 134 धावा दिल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांतही त्यानं 120 धावा देत केवळ एक विकेट घेतली आहे.
IND Vs NZ, 4th T20I: चौथ्या सामन्यावर पावसाचं सावट? भारताच्या विजयी मार्गात अडथळा?