नवी दिल्ली : आशिया चषकाची (Asia Cup 2022) स्पर्धा सुरू होण्यास आता आवघे काही दिवस उरले आहेत. मात्र या बहुचर्तित स्पर्धेपूर्वी खेळाडूंच्या दुखापतीची मालिका सुरू झाली आहे. पाकिस्तानच्या संघातील प्रमुख गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर श्रीलंकेच्या (Sri Lanka) संघाला देखील झटका बसला आहे. आशिया चषकातील पहिला सामना २७ ऑगस्ट रोजी श्रीलंका आणि अफगाणिस्तान (SL vs AFG) यांच्यामध्ये होणार आहे. दरम्यान, स्पर्धेच्या अगदी तोंडावरच यजमान संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
दुष्मंथा चमीरा स्पर्धेतून बाहेरश्रीलंकेच्या संघाचा घातक गोलंदाज दुष्मंथा चमीरा (Dushmantha Chameera) दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर झाला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ट्विटच्या माध्यमातून याबाबत अधिकृत माहिती दिली. चमीराला सरावादरम्यान दुखापत झाली असल्यामुळे तो आगामी स्पर्धेस मुकणार आहे. तर त्याच्या जागेवर २० सदस्यीय श्रीलंकेच्या संघात नुवान तुषाराला संधी मिळाली आहे.
आशिया चषकासाठी श्रीलंकेचा संघ - दासुन शनाका (कर्णधार), धनुष्का गुनाथिलका, पथुम निसंका, कुसल मेंडिस, चरित असलंका, बानुका राजपक्षे, अशेन बंडारा, धनंजया डी सिल्वा, वानिदू हसरंगा, महेश थिक्शाना, जेफ्री वांडरसे, प्रवीण जयविक्रेमा, बिनुरा फर्नांडो, चामिका फर्नांडो, मदुशंका, मथिशा पाथिराना, नुवान तुषारा, दिनेश चंडीमल, नुवानिंदू फर्नांडो, कसून रजिता.
आशिया चषक २०२२ चे संपूर्ण वेळापत्रक
- पहिला सामना - २७ ऑगस्ट - श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान - दुबई
- दुसरा सामना - २८ ऑगस्ट - भारत विरुद्ध पाकिस्तान - दुबई
- तिसरा सामना - ३० ऑगस्ट - बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान - शारजा
- चौथा सामना - ३१ ऑगस्ट - भारत विरुद्ध क्वालिफायर - दुबई
- पाचवा सामना - १ सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांगलादेश - दुबई
- सहावा सामना - २ सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर - शारजा
- सातवा सामना - ३ सप्टेंबर - बी१ विरुद्ध बी२ - शारजाह
- आठवा सामना - ४ सप्टेंबर - ए१ विरूद्ध ए२ - दुबई
- नववा सामना - ६ सप्टेंबर - ए१ विरुद्ध बी१ - दुबई
- दहावा सामना - ७ सप्टेंबर - ए२ विरुद्ध बी२ - दुबई
- अकरावा सामना - ८ सप्टेंबर - ए१ विरुद्ध बी२ - दुबई
- बारावा सामना - ९ सप्टेंबर - बी१ विरूद्ध ए२ - दुबई
- अंतिम सामना - ११ सप्टेंबर - १ ल्या सुपर ४ मधील पहिला विरूद्ध दुसऱ्या ४ मधील पहिला - दुबई