Join us  

IND vs AUS : "कोणतेही स्वप्न छोटे नसते...", विश्वचषकातील आपल्या पहिल्या सामन्यापूर्वी सिराज भावुक

भारतीय संघ आज ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यातून वन डे विश्वचषकाच्या मोहिमेची सुरूवात करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2023 2:00 PM

Open in App

india vs australia world cup 2023 : भारतीय संघ आज ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यातून वन डे विश्वचषकाच्या मोहिमेची सुरूवात करत आहे. भारतीय संघ बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी चेन्नईतील एम चिदंबरम स्टेडियमवर भिडत आहे. ही स्पर्धा भारतात होत असल्याने विश्वचषकाचा प्रबळ दावेदार म्हणून टीम इंडियाकडे पाहिले जात आहे. अशातच भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने विश्वचषकातील आपल्या सलामीच्या सामन्यापूर्वी एक भावनिक पोस्ट केली. 

मोहम्मद सिराजने सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले, "कोणतेही स्वप्न छोटे नसते, स्वप्ने सत्यात उतरत असतात. मी लहानपणी क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हापासून विश्वचषकात माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न होते. आता आम्ही एक संघ म्हणून आमची मोहीम सुरू करत आहोत म्हणून मी तुमचा पाठिंबा मागतो. तुम्हा सर्वांना अभिमान वाटावा हे माझे लक्ष्य आहे." 

दरम्यान, तब्बल १२ वर्षांनंतर भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगला आहे. आजच्या सामन्यासाठी नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजून गेला. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून यजमान भारतीय संघाला प्रथम गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. लक्षणीय बाब म्हणजे शुबमन गिल आज अनुपस्थित असून इशान किशन सलामीवीर म्हणून खेळत आहे.

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

वन डे विश्वचषकातील भारताचे सामने - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ८ ऑक्टोबर, चेन्नईभारत विरुद्ध अफगाणिस्तान - ११ ऑक्टोबर, दिल्लीभारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबादभारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणेभारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशालाभारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौभारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबईभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाताभारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपमोहम्मद सिराजभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया