हा नेदरलँड्सचा नाही भारताचा संघ आहे! भगव्या जर्सीत दिसली टीम इंडिया, चेन्नईत सुरू केला सराव

ICC World Cup 2023 : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेला अखेर आजपासून सुरूवात झाली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेता इंग्लंड आणि गत उपविजेता न्यूझीलंड यांच्यात उद्घाटनीय लढत सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 04:51 PM2023-10-05T16:51:15+5:302023-10-05T16:51:31+5:30

whatsapp join usJoin us
Ahead of their opening World Cup fixture against Australia in Chennai Team India have got a new training kit that resembles the famous Netherlands  | हा नेदरलँड्सचा नाही भारताचा संघ आहे! भगव्या जर्सीत दिसली टीम इंडिया, चेन्नईत सुरू केला सराव

हा नेदरलँड्सचा नाही भारताचा संघ आहे! भगव्या जर्सीत दिसली टीम इंडिया, चेन्नईत सुरू केला सराव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC World Cup 2023 : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेला अखेर आजपासून सुरूवात झाली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेता इंग्लंड आणि गत उपविजेता न्यूझीलंड यांच्यात उद्घाटनीय लढत सुरू आहे.  यजमान भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबरला चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. त्या सामन्यासाठी भारतीय संघ आज मैदानावर सरावासाठी उतरले अन् तेही भगव्या जर्सीत... नेदरलँड्सचा संघ ऑरेंज आर्मी म्हणून ओळखला जातो, परंतु आज टीम इंडियाची आर्मी ऑरेंज झाली दिसली. भारतीय संघाचा हा नवा सराव किट आहे..

सचिन तेंडुलकरने सांगितला २०११च्या वर्ल्ड कपमधील २१ बॅटींचा किस्सा! नसेल माहित तर नक्की वाचा...  

आम्ही या स्पर्धेत आमचा सर्वोत्तम खेळ करू आणि वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावू, असा विश्वास रोहितने काल व्यक्त केला होता. तो पुढे म्हणाला की,'' मागील तीन वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये यजमान संघ जिंकला आहे, पण या गोष्टीचा मी जास्त विचार करत नाही. आम्ही सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू आणि या स्पर्धेचा मनापासून आनंद लुटू. आम्ही आमच्या रणनीतीची कशी अंमलबजावणी होईल हे पाहू आणि आमच्या कौशल्याचा पूर्ण वापर करून वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रयत्न करू.''


 तो पुढे म्हणाला,''मी या स्पर्धेत सहभागी संघांच्या कर्णधारांना आणि खेळाडूंना एक खात्री देऊ इच्छितो की भारतात होणारा हा वर्ल्ड कप तुम्हाला थक्क करेल आणि भारतात होणाऱ्या या स्पर्धेच्या तुम्ही प्रेमात पडाल. माझ्यामते खेळाडूला तुम्ही स्वातंत्र्य दिले की तो त्याच्या संपूर्ण क्षमतेनं खेळतो. कर्णधार म्हणून खेळाडूंना त्यांचा नैसर्गिक खेळ करण्याची मोकळीक देणे ही माझी जबाबदारी आहे.''  ( ENG vs NZ Live Scorecard ) 


भारतीय संघ -  रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

वनडे विश्वचषकातील भारताचे सामने - 
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ८ ऑक्टोबर, चेन्नई
भारत विरुद्ध अफगाणिस्तान - ११ ऑक्टोबर, दिल्ली
भारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबाद
भारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणे
भारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशाला
भारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौ
भारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबई
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाता
भारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू 
 

Web Title: Ahead of their opening World Cup fixture against Australia in Chennai Team India have got a new training kit that resembles the famous Netherlands 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.