बाबो! 13 षटकार, 7 चौकार, 28 चेंडूंत झळकावलं शतक; टी 10 सामन्यात उभा केला धावांचा एव्हरेस्ट

Ahmed Musaddiq smashes the fastest ton युरोपियन क्रिकेट सीरिजमध्ये एका फलंदाजानं फक्त 28 चेंडूंत शतक झळकावण्याचा पराक्रम केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 10:14 AM2021-06-08T10:14:17+5:302021-06-08T10:16:44+5:30

whatsapp join usJoin us
Ahmed Musaddiq smashes the fastest ton in ECS history off just 28 balls | बाबो! 13 षटकार, 7 चौकार, 28 चेंडूंत झळकावलं शतक; टी 10 सामन्यात उभा केला धावांचा एव्हरेस्ट

बाबो! 13 षटकार, 7 चौकार, 28 चेंडूंत झळकावलं शतक; टी 10 सामन्यात उभा केला धावांचा एव्हरेस्ट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

युरोपियन क्रिकेट सीरिजमध्ये एका फलंदाजानं फक्त 28 चेंडूंत शतक झळकावण्याचा पराक्रम केला. त्यानं दहा षटकांच्या सामन्यात हा पराक्रम करताना 13 षटकार व 7 चौकारांची आतषबाजी केली. Kummerfelder Sportverein संघाकडून खेळणाऱ्या अहमद मुसाद्दिकने THCC Hamburg संघाविरुद्ध हा पराक्रम केला. युरोपियन क्रिकेट इतिहासातील हे सर्वात जलद शतक ठरले. त्यानं भारतीय वंशाच्या गौहर मनन याचा 29 चेंडूंत शतकाचा विक्रम मोडला. ( Ahmed Musaddiq smashes the fastest ton) 

32 वर्षीय अहमदने पहिल्या चेंडूपासूनच फटकेबाजीला सुरूवात केली. त्यानं 33 चेंडूंत 115 धावांची विक्रमी खेळी केली. त्याच्या या दमदार खेळीच्या जोरावर Kummerfelder Sportverein संघानं 10 षटकांत 2 बाद 198 धावांचा एव्हरेस्ट उभा केला. अहमदच्या या विक्रमी खेळीत  7 चौकार 13 षटकारांचा समावेश होता आणि याचा अर्थ त्यानं अवघ्या 20 चेंडूंत 106 धावा कुटल्या. त्यानं THCC Hamburg च्या गोलंदाजांची निर्दयीपणे धुलाई केली.

अमहनदनं पहिल्याच षटकात फटकेबाजी करताना 26 धावा चोपल्या. त्यानंतर त्याल रोखण्यासाठी फिरकीपटू मैदानावर उतरवले, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही.  

13 चेंडूंत शतक अन् अखेरच्या चेंडूवर बाद 
अहमदनंं पाचव्या षटकात बहराम अलीच्या गोलंदाजीवर चार  षटकार खेचून 13 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. याच खेळीसह त्यानं सहकारी खेळाडूसह शतकी भागीदारीही पूर्ण केली. अहमदनं एकेरी धाव घेऊन त्याचे शतक पूर्ण केले. डावाच्या अखेरच्या चेंडूवर त्याची विकेट पडली. तोपर्यंत त्यानं 33 चेंडूंत 115 धावा कुटल्या होत्या.  त्याच्याव्यतिरिक्त शोएब आजम खान यानं13 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकारांंसह 32 धावा केल्या. तर दिलराज सिंहने 4 चौकार व 3 षटकारांच्या मदतीनं 14 चेंडूंत नाबाद 40 धावा केल्या. THCC Hamburgच्या अभिक जानाची सर्वाधिक धुलाई झाली. त्याच्या 2 षटकांत 42 धावा चोपल्या गेल्या. त्याला एक विकेटही मिळाली.  

145 धावांनी दणदणीत विजय
198 धावांचा पाठलाग करताना THCC Hamburgच्या फलंदाजांवर प्रचंड दडपण जाणवले. त्यांना 10 षटकांत 7 बाद 53 धावा करता आल्या. यासह Kummerfelder Sportverein संघानं हा सामना 145 धावांनी जिंकला. मुहम्मद हजरत सैद, आशिष शर्मा व असद अहमद खान यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.  

Web Title: Ahmed Musaddiq smashes the fastest ton in ECS history off just 28 balls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.