IPL 2022 Ahmedabad IPL team name reveal - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीने सोमवारी त्यांच्या संघाच्या नावाची घोषणा केली. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली हा संघ मैदानावर उतरणार आहे आणि त्याला राशिद खान या स्टार फिरकीपटूसह शुबमन गिल या युवा फलंदाजाची साथ मिळणार आहे. CVC Capital यांनी ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे. आज त्यांनी त्यांच्या संघाचं नाव अहमदाबाद टायटन्स ( Ahmedabad Titans) असे असेल हे जाहीर केले.
संजीव गोएंका यांच्या RPSG Group आणि CVC Capital यांनी विक्रमी किमतीत अनुक्रमे लखनौ व अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. Indian Premier League मध्ये ( IPL 2022) आता मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, सनयारझर्स हैदराबाद, किंग्स पंजाब, लखनौ व अहमदाबाद असे दहा संघ खेळणार आहेत. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी नावावर केली. या नव्या करारानं बीसीसीआयला १२, ६९० कोटींचा फायदा झाला आहे.
CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत. CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे ५२ कोटी शिल्लक रक्कम आहे.
Names of 10 franchises in IPL:
Chennai Super Kings Mumbai IndiansKolkata Knight RidersSunrisers HyderabadPunjab KingsDelhi CapitalsRajasthan RoyalsRoyal Challengers BangloreLucknow Super GiantsAhmedabad Titans