बिपाशा बसूच्या उपस्थितीने पुरस्कार सोहळ्याला चार चांद लागले.
अभिनेत्री मलायका अरोरा खानचा एक अंदाज.
व्हाईट अँड गोल्डन ड्रेसमध्ये श्रीलंकन ब्युटी जॅकलीनचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होते.
गुणी अभिनेता फरहान अख्तर
श्रद्धा कपूरने खलनायक हू मै चोली के पीछे क्या है व ओम शांती ओम ही गाणी सादर करून आपली छाप सोडली.
रितेश देशमुखच्या लय भारी चित्रपटाला उत्कृष्ट प्रादेशिक चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला.
हृतिक रोशनच्या शानदार नृत्यामुळे श्रोते थरारून गेले.
अनुष्का शर्माने आपल्या बॉम्बे वेल्वेट चित्रपटातील गाण्यावर जबरदस्त नृत्य सादर केले.
दीपिका पदुकोनला आयफाचा वूमन ऑफ दी इयर पुरस्कार मिळाला. मला प्रेरित करणाऱ्या लाखो महिलांसाठी हा पुरस्कार असे म्हणत तिने हा पुरस्कार स्वीकारला.
हैदर चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवणा-या शाहिद कपूरने या सोहळ्यादरम्यान उत्कृष्ट नृत्यही सादर केले.
१६वा आयफा पुरस्कार क्वालालांपूर येथे मोठ्या दिमाखात पार पडला. उत्कृष्ट अभिनयाने नटलेला क्वीन हा सर्वोत्कृष्ट चित्रपट तर त्यातील भूमिकेसाठी कंगना राणावतला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. सोनाक्षी सिन्हाने आपल्या सादरीकरणाने प्रेक्षकांना जिंकून घेतले.