अजयने पाकिस्तानला दुसऱ्यांदा चोपला; अफगानच्या विजयानंतर आठवला '९६' चा जडेजा

१९९६ च्या विश्वचषक सामन्यातील भारत आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अजय जडेजाने महत्त्वपूर्ण खेळी केली होती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 10:08 AM2023-10-24T10:08:52+5:302023-10-24T10:37:50+5:30

whatsapp join usJoin us
Ajay bowls Pakistan for the second time; Jadeja of '96 remembered after Afghan victory | अजयने पाकिस्तानला दुसऱ्यांदा चोपला; अफगानच्या विजयानंतर आठवला '९६' चा जडेजा

अजयने पाकिस्तानला दुसऱ्यांदा चोपला; अफगानच्या विजयानंतर आठवला '९६' चा जडेजा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अफगाणिस्ताननेपाकिस्तानचा धुव्वा उडवत विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर जगभरातील क्रिकेट चाहत्यांकडून टीम अफगाणिस्तानचं अभिनंदन करण्यात येत आहे. भारतीय चाहतेही अफगाणिस्तानच्या गोलंदाजी आणि फलंदाजीवर फिदा झाल्याचं दिसून आलं. भारतीयांनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अफगानला चिअरअप केलं. अखेर, २८३ धावांचा पाठलाग करताना अफगानी फलंदाजांनी तडाखेबंद फलंदाजी करत ८ गडी राखून मोठा विजय मिळवला. या विजयानंतर अनेक भारतीयांना १९९६ सालचा विश्वचषक स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना आठवला. या सामन्यातील अजय जडेजाची खेळी आठवली. 

१९९६ च्या विश्वचषक सामन्यातील भारत आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अजय जडेजाने महत्त्वपूर्ण खेळी केली होती. ६ व्या क्रमांकावर आलेल्या अजयच्या तुफानी फटकेबाजीमुळेच भारताने तो सामना जिंकला होता. या सामन्यात अजय जडेजाने २५ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकार ठोकत ४५ धावांचा अफलातून खेळ केला होता. पाकिस्तानी गोलंदाजांची आणि खेळाडूंची दमछाक केली होती. त्यानंतर, पुन्हा एकदा २०२३ मध्ये अजय जडेजाने पाकिस्तानी खेळाडूंचा विश्वचषक स्पर्धेतच धुव्वा उडवला. अफगाणिस्तानच्या या विजयात अजय जडेजाचंही योगदान आहे. कारण, अजय जडेजा सध्या टीम अफगाणिस्तानचा मेंटर आहे. 


भारताने १९९२ पासून २०२३ पर्यंतच्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत केलं आहे. तेव्हापासून दोन्ही देशातील क्रिकेट सामन्यात युद्धाप्रमाणेच वातावरण असल्याचं दिसून येतं. त्यापैकी, १९९६ च्या सामन्यात अजय जडेजामुळे भारताने तो विजय मिळवला होता.  त्यानंतर, आता अफगाणिस्तानच्या संघाचा मेंटर बनून अजयने विश्वचषक स्पर्धेत संघातील फलंदाजांना मार्गदर्शन केलं आहे. भारतीय खेळपट्टी आणि फिरकी गोलंदाजांना टॅकल करण्याचं अनुभवी ज्ञान अजयने अफगाणिस्तानच्या फलंदाजांना दिलं. त्याचा निश्चित त्यांना मैदानात फायदा होत आहे. त्यातूनच संघाने विश्वविजेत्या इंग्लंड आणि पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघांचा पराभव केला. 
 

Web Title: Ajay bowls Pakistan for the second time; Jadeja of '96 remembered after Afghan victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.