Join us

आशिष नेहराच्या पत्नीसोबत होता अजय जडेजा, कारमधून एकत्र उतरले, फोटोग्राफरनी पोझ देण्यास सांगताच म्हणाला ही माझ्यासोबत...

Ajay Jadeja & Ashish Nehra : अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा यांच्या विवाह सोहळ्याला आशिष नेहराची पत्नी रुष्मा आणि अजय जडेजा हे एकाच कारमधून आले होते. त्यानंतर घडलेला प्रसंग चर्चेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 09:42 IST

Open in App

भारताचा माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा खूप गमतीदार स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. तर माजी क्रिकेटपटू अजय जडेजा हा त्याच्या कूल स्वभावासाठी ओळखला जातो. हल्लीच अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा यांच्या विवाह सोहळ्यादरम्यान घडलेल्या एका प्रसंगामुळे या दोघांचीही चर्चा सुरू आहे. या विवाह सोहळ्यात आशिष नेहरा त्याची पत्नी रुष्मा आणि अजय जडेजा हे एकाच कारमधून आले होते. त्यानंतर घडलेला प्रसंग चर्चेत आहे.

अजय जडेजा आणि आशिष नेहरा हे चांगले मित्र आहेत. क्रिकेट सामन्यांच्या समालोचनादरम्यानही ते एकत्र दिसत असतात. मात्र सध्या अजय जडेजा, आशिष नेहरा आणि नेहराच्या पत्नीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. नीना गुप्ता यांच्या मुलीच्या लग्नसमारंभामधील हा व्हिडीओ आहे. त्याचं झालं असं की, हे तिघेही एकाच कारमधून विवाह स्थळी पोहोचले. तिथे कारमधून अजय जडेजा पहिल्यांदा उतरला. त्यापाठोपाठ आशिष नेहराची पत्नी कारमधून बाहेर आली. तर आशिष नेहराला बाहेर येण्यास थोडा उशीर झाला. दरम्यान, तिथे फोटो टिपण्यासाठी हजर असलेल्या फोटोग्राफरना वाटलं की अजय जडेजा आणि आशिष नेहराची पत्नी एकत्र आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांना एकत्र फोटो देण्यासाठी आग्रह केला. 

मात्र या आग्रहामुळे दोघेही गडबडले. त्यानंतर अजय जडेजाने प्रसंगावधान राखत सांगितलं की, ही माझ्यासोबत नाही आहे, तर ती त्यांच्यासोबत (आशिष नेहरा) आहे. तेवढ्यात आशिष नेहराही तिथे आला. त्यानंतर नेहरा आणि त्याच्या पत्नीने एकत्र फोटेसेशन केले. तसेत त्यातील काही फोटोंमध्ये अजय जडेजालाही सोबत घेतले. आता या प्रसंगाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.  

टॅग्स :आशिष नेहराभारतीय क्रिकेट संघसेलिब्रिटी
Open in App