मुंबईकर फिरकीपटूची न्यूझीलंडच्या कसोटी संघात निवड

मुंबईत जन्मलेला फिरकीपटू अजाझ पटेल याची न्यूझीलंडच्या कसोटी संघात निवड झाली आहे. न्यूझीलंडचा संघ ऑक्टोबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती येथे पाकिस्तानविरूद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 01:30 PM2018-07-25T13:30:06+5:302018-07-25T13:30:38+5:30

whatsapp join usJoin us
Ajaz patel, Mumbai born spinner elected in New Zealand Test squad | मुंबईकर फिरकीपटूची न्यूझीलंडच्या कसोटी संघात निवड

मुंबईकर फिरकीपटूची न्यूझीलंडच्या कसोटी संघात निवड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वेलिंग्टन - मुंबईत जन्मलेला फिरकीपटू अजाझ पटेल याची न्यूझीलंडच्या कसोटी संघात निवड झाली आहे. न्यूझीलंडचा संघ ऑक्टोबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती येथे पाकिस्तानविरूद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. 29 वर्षीय पटेलने न्यूझीलंडच्या स्थानिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत आणि त्याला 2017च्या सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले आहे. 
 



पटेलचा जन्म हा मुंबईचाच, परंतु लहानपणीच तो न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाला. त्याने 21.52 च्या सरासरीने 48 विकेट्स घेतल्या आहेत. दुखापतग्रस्त मिचेल सँटनर याच्या जागी पटेलला संघात संधी देण्यात आलेली आहे, असे निवड समिती प्रमुख गॅव्हीन लार्सन यांनी सांगितले. 
असा असले न्यूझीलंडचा संघ - केन विलियम्सन ( कर्णधार ), टोड अॅस्टल, टॉम ब्लंडल, ट्रेंट बोल्ट, कॉलीन डी ग्रँडहोम, मॅट हेन्री, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाझ पटेल, जीत रावल, इश सोधी, टीम साऊदी, रॉस टेलर, नेल वॅगनर, बीजे वॉटलींग.  


 

Web Title: Ajaz patel, Mumbai born spinner elected in New Zealand Test squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.