ठळक मुद्देभारताच्या कसोटी संघात मोहम्मद शामीला यावेळी संधी देत बीसीसीआयने त्याच्यावर विश्वास दाखवला आहे.
नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी अजिंक्य रहाणेला कर्णधारपद देण्यात आले आहे. पण इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत मात्र अजिंक्यला संघात स्थान देण्यात आलेले नाही. भारताच्या कसोटी संघात मोहम्मद शामीला यावेळी संधी देत बीसीसीआयने त्याच्यावर विश्वास दाखवला आहे.
विराट कोहली सरे या कौंटी संघाबरोबर काही सामने खेळणार आहे. त्यामुळे त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. पण ट्वेन्टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये मात्र तो संघाचे नेतृत्व करणार आहे.
अफगाणिस्तानविरुद्धचा कसोटी संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, करुण नायर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद शामी, हार्दिक पंड्या, इशांत शर्मा, शार्दुल ठाकूर.
आयर्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-20 सामन्यांसाठी संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, सुरेश रैना, मनीष पांडे, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव. वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या, सिद्धार्थ कौल, उमेश यादव.
इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-20 संघासाठी संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या, सिद्धार्थ कौल, उमेश यादव.
इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या, सिद्धार्थ कौल, उमेश यादव.
Web Title: Ajinkya captain for a Test; But outside the one-day squad
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.