BCCI Central Contract : Ajinkya Rahane, चेतेश्वर पुजारा यांना BCCIकडून धक्का; हार्दिक पांड्यालाही दिला इशारा

बीसीसीआयने बुधवारी वार्षिक करार जाहीर केले. अपेक्षेनुसार अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांना A गटातून B गटात पाठवण्यात आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 08:44 PM2022-03-02T20:44:43+5:302022-03-02T20:55:26+5:30

whatsapp join usJoin us
Ajinkya Rahane and Cheteshwar Pujara dropped from Grade A to B in latest BCCI central contracts; Hardik Pandya demoted from Grade A to C | BCCI Central Contract : Ajinkya Rahane, चेतेश्वर पुजारा यांना BCCIकडून धक्का; हार्दिक पांड्यालाही दिला इशारा

BCCI Central Contract : Ajinkya Rahane, चेतेश्वर पुजारा यांना BCCIकडून धक्का; हार्दिक पांड्यालाही दिला इशारा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बीसीसीआयने बुधवारी वार्षिक करार जाहीर केले. अजिंक्य रहाणेचेतेश्वर पुजारा यांची कामगिरी निराशाजनक झाली आहे आणि त्यामुळे कसोटी संघातून त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी अजिंक्य व पुजारा दोघंही रणजी करंडक स्पर्धेत दम दाखवत आहेत. पण, आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांच्या कामगिरीचा त्यांच्या करारावरही परिणाम होणार हे अपेक्षित होते. अपेक्षेनुसार रहाणे व पुजारा यांना A गटातून B गटात पाठवण्यात आले. त्यांना BCCIcentral contracts नुसार आधी वर्षाला ५ कोटी मानधन मिळायचे, आता त्यांना ३ कोटीच मानधन मिळणार आहे. 

A+ गटात विराट कोहली, जसप्रीत बुमराह  व रोहित शर्मा हे कायम आहेत आणि त्यांना ७ कोटी मानधन मिळणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर तंदुरुस्तीच्या कारणामुळे संघाबाहेर असलेल्या हार्दिक पांड्यालाही फटका बसला. हार्दिकला A गटातून थेट C गटात पाठवले गेले आणि आता त्याला ५ कोटींएवजी १ कोटीच पगार मिळेल. श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळल्यानंतर बीसीसीआयशी थेट पंगा घेणाऱ्या यष्टिरक्षक वृद्धीमान सहाला B गटातून C गटात स्थान मिळाले. भुवनेश्वर कुमार व उमेश यादव यांचेही डिमोशन झाले. कुलदीप यादव व नवदीप सैनी यांना करार देण्यात आलेला नाही. 

A + ( ७ कोटी) 

  • विराट कोहली
  • जसप्रीत बुमराह
  • रोहित शर्मा

 

A ( ५ कोटी) 

  • आर अश्विन
  • रवींद्र जडेजा
  • लोकेश राहुल
  • मोहम्मद शमी 
  • रिषभ पंत

 

B  ( ३ कोटी) 

 

C ( १ कोटी)

  • शिखर धवन
  • उमेश यादव
  • भुवनेश्वर कुमार 
  • हार्दिक पांड्या
  • वॉशिंग्टन सुंदर
  • दीपक चहर
  • शुबमन गिल
  • हनुमा विहारी
  • युझवेंद्र चहल
  • वृद्धीमान सहा
  • सूर्यकुमार यादव
  • मयांक अग्रवाल 
     

Web Title: Ajinkya Rahane and Cheteshwar Pujara dropped from Grade A to B in latest BCCI central contracts; Hardik Pandya demoted from Grade A to C

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.