बीसीसीआयने बुधवारी वार्षिक करार जाहीर केले. अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांची कामगिरी निराशाजनक झाली आहे आणि त्यामुळे कसोटी संघातून त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी अजिंक्य व पुजारा दोघंही रणजी करंडक स्पर्धेत दम दाखवत आहेत. पण, आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांच्या कामगिरीचा त्यांच्या करारावरही परिणाम होणार हे अपेक्षित होते. अपेक्षेनुसार रहाणे व पुजारा यांना A गटातून B गटात पाठवण्यात आले. त्यांना BCCIcentral contracts नुसार आधी वर्षाला ५ कोटी मानधन मिळायचे, आता त्यांना ३ कोटीच मानधन मिळणार आहे.
A+ गटात विराट कोहली, जसप्रीत बुमराह व रोहित शर्मा हे कायम आहेत आणि त्यांना ७ कोटी मानधन मिळणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर तंदुरुस्तीच्या कारणामुळे संघाबाहेर असलेल्या हार्दिक पांड्यालाही फटका बसला. हार्दिकला A गटातून थेट C गटात पाठवले गेले आणि आता त्याला ५ कोटींएवजी १ कोटीच पगार मिळेल. श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळल्यानंतर बीसीसीआयशी थेट पंगा घेणाऱ्या यष्टिरक्षक वृद्धीमान सहाला B गटातून C गटात स्थान मिळाले. भुवनेश्वर कुमार व उमेश यादव यांचेही डिमोशन झाले. कुलदीप यादव व नवदीप सैनी यांना करार देण्यात आलेला नाही.
A + ( ७ कोटी)
- विराट कोहली
- जसप्रीत बुमराह
- रोहित शर्मा
A ( ५ कोटी)
- आर अश्विन
- रवींद्र जडेजा
- लोकेश राहुल
- मोहम्मद शमी
- रिषभ पंत
B ( ३ कोटी)
- चेतेश्वर पुजारा
- अजिंक्य रहाणे
- अक्षर पटेल
- शार्दूल ठाकूर
- श्रेयस अय्यर
- मोहम्मद सिराज
- इशांत शर्मा
C ( १ कोटी)
- शिखर धवन
- उमेश यादव
- भुवनेश्वर कुमार
- हार्दिक पांड्या
- वॉशिंग्टन सुंदर
- दीपक चहर
- शुबमन गिल
- हनुमा विहारी
- युझवेंद्र चहल
- वृद्धीमान सहा
- सूर्यकुमार यादव
- मयांक अग्रवाल