अजिंक्य रहाणेच्या 'वडा पाव' प्रश्नावर सचिन तेंडुलकरचं मजेशीर उत्तर...

भारताचा कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे सध्या सुट्टीवर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 03:24 PM2020-01-10T15:24:32+5:302020-01-10T15:25:32+5:30

whatsapp join usJoin us
Ajinkya Rahane ask How do you like your vada pav? Sachin Tendulkar give hilarious reply | अजिंक्य रहाणेच्या 'वडा पाव' प्रश्नावर सचिन तेंडुलकरचं मजेशीर उत्तर...

अजिंक्य रहाणेच्या 'वडा पाव' प्रश्नावर सचिन तेंडुलकरचं मजेशीर उत्तर...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताचा कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे सध्या सुट्टीवर आहे. टीम इंडिया सध्या श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिका खेळत आहे आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे मालिका होणार आहे. 2018 मध्ये रहाणे अखेरचा वन डे सामना खेळला होता. त्यानंतर तो कसोटी संघाचा नियमित सदस्य आहे. ऑसी मालिकेनंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे आणि तेव्हा रहाणे संघात सहभागी होईल. तत्पूर्वी रहाणे भारत अ संघाविरुद्ध न्यूझीलंड दौऱ्यावर दुसऱ्या चार दिवसीय सामन्यासाठी रवाना होणार आहे. 

कुटुंबवत्सल अजिंक्य; कन्या आर्यासोबत गावची सफर

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या रहाणेनं रणजी करंडक स्पर्धेत मुंबईचे प्रतिनिधित्व केले. दोन सामन्यांत त्याला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मात्र, तो न्युझीलंडमध्ये दमदार कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे. सध्या रहाणे आपल्या कुटुंबियांसोबत आणि मुलगी आर्यासोबत वेळ घालवत आहे. तो नुकताच सहपरिवार गावी जाऊन आला. त्याचे फोटो त्यानं सोशल मीडियावर शेअर केले होते. 

रहाणेनं शुक्रवारी सोशल मीडियावर आणखी एक फोटो शेअर केला. त्यात त्याच्या हातात मुंबईचा वडा पाव दिसत आहे. वडा पाव वरून रहाणेनं नेटिझन्सला प्रश्न विचारला आणि त्याला महान फलंदाज सचिन तेंडुलकरकडून अनपेक्षित उत्तर मिळालं. रहाणेनं कोणता प्रश्न विचारला आणि तेंडुलकरनं त्यावर काय उत्तर दिलं... चला पाहूया...

अजिंक्यनं विचारलं की, तुम्हाला वडा पाव कसा खायला आवडतो?
1. चहासोबत
2. चटणीसोबत
3. फक्त वडा पाव


त्यावर सचिननं उत्तर दिलं की, 
लाल चचणी, थोडीशी हिरवी आणि चिंचाची चटणी... यांचे योग्य मिश्रण वडा पाव टेस्टी बनवतो. 

Web Title: Ajinkya Rahane ask How do you like your vada pav? Sachin Tendulkar give hilarious reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.