Join us  

India vs Australia, 2nd Test : Well Done Ajinkya!; बॉक्सिंग डे कसोटीत 'हा' इतिहास रचणारा पहिला भारतीय फलंदाज

India vs Australia, 2nd Test : विराट कोहलीच्या ( Virat Kohli) अनुपस्थितीत भारतीय फलंदाजी डगमगून जाईल, असा अंदाज होता. पण,  अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) मुंबईकरांचा 'खडूस'पणा दाखवला आणि सर्वांचे अंदाज चुकवले.

By स्वदेश घाणेकर | Published: December 27, 2020 12:36 PM

Open in App
ठळक मुद्देअजिंक्य रहाणेच्या नाबाद शतकानं टीम इंडियाकडे ८२ धावांची आघाडीअजिंक्यची रवींद्र जडेजासह सहाव्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारीदुसऱ्या दिवसअखेर टीम इंडियाच्या ५ बाद २७७ धावा

India vs Australia, 2nd Test : विराट कोहलीच्या ( Virat Kohli) अनुपस्थितीत भारतीय फलंदाजी डगमगून जाईल, असा अंदाज होता. पण,  अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) मुंबईकरांचा 'खडूस'पणा दाखवला आणि सर्वांचे अंदाज चुकवले. बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी कल्पक नेतृत्वानं वाहवाह मिळवणाऱ्या अजिंक्यनं दुसऱ्या दिवशी फलंदाजीने सर्वांना मंत्रमुग्ध केलं. अजिंक्यनं केवळ वैयक्तिक शतकी खेळीच केली नाही, तर हनुमा विहारी, रिषभ पंत यांच्यासह अर्धशतकी आणि रवींद्र जडेजासह शतकी भागीदारी करून संघाच्या धावसंख्येत भर घातली. अजिंक्य रहाणेनं टीम संकटात असताना शतकी खेळी केली. कसोटीतील त्याचे हे १२ वे शतक ठरले. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे हे दुसरे शतक आहे. त्याच्या या शतकानं मोठा इतिहास घडवला.  ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर गुंडाळल्यानंतर टीम इंडियावर जबाबदारी आहे ती मोठी आघाडी घेण्याची. पहिल्या दिवशी मयांक अग्रवाल भोपळा न फोडता माघारी परतला, परंतु पदार्पणवीर शुबमन गिल ( Shubhaman Gill) आणि चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) यांनी टीम इंडियाला सावरले.  ६५ चेंडूंत ८ चौकारांसह ४५ धावा करणारा गिल व  १७ धावांवर पुजारा बाद झाला. अजिंक्यनं त्यानंतर हनुमा विहारी व रिषभ पंत यांच्यासह अनुक्रमे ५२ व ५७ धावांची भागीदारी करून टीम इंडियाला मोठ्या आघाडीच्या दिशेनं वाटचाल करून दिली. संघात पुनरागमन करणाऱ्या रिषभ पंतनं आक्रमक खेळावर भर दिला. मिचेल स्टार्कनं पंतला माघारी जाण्यास भाग पाडले. २९ धावांवर तो माघारी परतला. रहाणे एका बाजूनं खिंड लढवत आहे. अजिंक्यनं १९६ चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीनं शतक पूर्ण केलं.  मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर दोन किंवा त्याहून अधिक शतकं करणारा अजिंक्य हा चौथा परदेशी फलंदाज ठरला. यापूर्वी विनू मंकड ( १९४८), सादीक मोहम्मद ( १९७२ आणि १९७७) आणि माजीद खान ( १९७२ व १९७९) यांनी अशी कामगिरी केली. बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक करणारा पाचवा भारतीय फलंदाजही अजिंक्य ठरला.  सचिन तेंडुलकर ( १९९९), विरेंद्र सेहवाग ( २००३), विराट कोहली ( २०१४), अजिंक्य रहाणे ( २०१४ व २०२०) व  चेतेश्वर पुजारा ( २०१८) यांनी ही कामगिरी केली. बॉक्सिग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन शतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला.  ऑस्ट्रेलियात कसोटी शतक झळकावणारा तो पाचवा भारतीय कर्णधार आहे. यापूर्वी मोहम्मद अझरुद्दीन ( १०६ धावा, अॅडलेड १९९१/९२), सचिन तेंडुलकर ( ११६ धावा, मेलबर्न १९९९/००), सौरव गांगुली ( १४४ धावा, गॅबा २००३/०४), विराट कोहली ( ११५ धावा व १४१ धावा, अॅडलेड, २०१४/१५), विराट कोहली ( १४७ धावा, सिडनी २०१४/१५) आणि विराट कोहली ( १२३ धावा, पर्थ २०१८/१९) यांनी हा पराक्रम केला. 

पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. भारतानं दुसऱ्या दिवसअखेर ५ बाद २७७ धावा करून ८२ धावांची आघाडी घेतली आहे. अजिंक्य १०४ आणि रवींद्र जडेजा ४० धावांवर नाबाद आहेत. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाअजिंक्य रहाणेरिषभ पंतरवींद्र जडेजा