India vs Australia, 2nd Test : अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) कॅप्टन्स इनिंग खेळताना टीम इंडियाला आघाडीच्या दिशेनं वाटचाल करून दिली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या प्रत्युत्तरात भारतानं ६२ षटकांत ५ बाद १८५ धावा केल्या आहेत. वृद्धीमान साहाच्या जागी संघात स्थान मिळालेल्या रिषभ पंतला ( Rishabh Pant) मोठी खेळी करण्याची संधी होती. त्यानं आक्रमक खेळ करून तसा विश्वास दाखवला, पण मिचेल स्टार्कनं त्याला बाद केले. रहाणेनं अर्धशतकी खेळी करून महेंद्रसिंग धोनीचा ( MS Dhoni) विक्रम मोडला.
कर्णधार अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांनी ऑसी गोलंदाजांचा धैर्यानं सामना केला. दोघांनी संयमी खेळी करताना ५२ धावांची भागीदारी केली. नॅथन लियॉननं त्यांची एकाग्रता भंग केली अन् जोरदार फटका मारण्याच्या नादात विहारी ( २१) झेलबाद झाला. संघात पुनरागमन करणाऱ्या रिषभ पंतनं आक्रमक खेळावर भर दिला. त्यानं ऑसींचा प्रमुख गोलंदाज पॅट कमिन्स यालाच लक्ष्य केले. पंतच्या आक्रमक खेळीमुळे ऑसींना त्यांचे डावपेच बदलावे लागले. पंतनं पाचव्या विकेटसाठी अजिंक्यसह ७३ चेंडूंत ५० धावांची भागीदारी केली. मिचेल स्टार्कनं पंतला माघारी जाण्यास भाग पाडले. २९ धावांवर तो माघारी परतला. रहाणे एका बाजूनं खिंड लढवत आहे आणि त्यानं अर्धशतक पूर्ण केलं.
पाच किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर परदेशात सर्वाधिक अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज ( Most 50+ scores by an Indian away from home, while batting at No.5 or below)२८ - व्ही व्ही एस लक्ष्मण ( ८४ डाव) २४ - सौरव गांगुली ( ८५ डाव)२० - अजिंक्य रहाणे ( ६२ डाव) १९ - महेंद्रसिंग धोनी ( ८३ डाव)१६ - मोहम्मद अझरुद्दीन ( ६६ डाव)