Join us  

Ajinkya Rahane, IND vs SA: फलंदाजी करताना नेमकं काय बडबडत होता अजिंक्य रहाणे? कॅमेरात कैद झालं सारंकाही, पाहा...

Ajinkya Rahane, IND vs SA: भारतीय कसोटी संघाच्या उप-कर्णधारपदावरुन हटवण्यात आल्यानंतर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) पहिल्यांदाच फलंदाजीसाठी जेव्हा मैदानात उतरला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर नक्कीच दबाव दिसून येत होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 7:46 PM

Open in App

Ajinkya Rahane, IND vs SA: भारतीय कसोटी संघाच्या उप-कर्णधारपदावरुन हटवण्यात आल्यानंतर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) पहिल्यांदाच फलंदाजीसाठी जेव्हा मैदानात उतरला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर नक्कीच दबाव दिसून येत होता. दक्षिण आफ्रिकेविरोधात (South Africa) पहिल्या कसोटी जेव्हा रहाणेला भारतीय संघात स्थान देण्यात आलं तेव्हा अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या होत्या. कारण उप-कर्णधारपद काढून घेतल्यानंतर राहणेला आता संघात स्थान दिलं जाणार नाही. त्याच्या जागी श्रेयस अय्यरला संधी देण्यात येईल अशी चर्चा होती. 

सेंच्युरियन कसोटीत मोठी खेळी साकारून स्वत:ला सिद्ध करण्याची जबाबदारी आणि दबाव रहाणेवर आहे. कारण रहाणे तसं करण्यास अपयशी ठरला तर त्याच्या संघातील स्थानावर गंडांतर येऊ शकतं याची कल्पना रहाणेला देखील आहे. सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्या दिवशी रहाणे पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि दिवसाअखेर नाबाद ४० धावांवर खेळत होता. रहाणेनं मैदानात जम बसवत सावध खेळी साकारली. रहाणेनं ८१ चेंडूत नाबाद ४० धावा केल्या आहेत. पावसाच्या व्यत्ययामुळे कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरूच होऊ शकला नाही. 

रहाणे फलंदाजीवेळी नेमकं काय बडबडत होता?बॉक्सिंग डे टेस्टच्या पहिल्या दिवसाचा रहाणेच्या फलंदाजीचा एक व्हिडिओ सोशल मीडियात सध्या तुफान व्हायरल होत आहे. यात रहाणे फलंदाजी करत असताना चेंडूवर लक्ष केंद्रीत तर करतच आहे. पण त्याचवेळी वारंवार काहीतरी बडबडत असल्याचं दिसून येत आहे. रहाणे नेमकं काय बडबडत होता अशी चर्चा सुरू झाली आणि त्यामागचं गुपीत अखेर उलगडलं आहे. 

गोलंदाज गोलंदाजीसाठी धाव घेत असताना रहाणे चेंडूवर लक्ष केंद्रीत व्हावं यासाठी Watch The Ball असं वारंवार बडबडत असतो. यातून चेंडूवर लक्ष केंद्रीत करण्यास रहाणेला मदत मिळते. 

टॅग्स :अजिंक्य रहाणेभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
Open in App