अजिंक्य रहाणे पुन्हा मदतीसाठी धावला, महाराष्ट्राला 'मिशन वायू' अंतर्गत केली ऑक्सिजनची मोठी मदत

Ajinkya Rahane: अजिंक्य राहणेनं कोरोना संकटात खास महाराष्ट्रासाठी मदत जाहीर केली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 05:34 PM2021-05-01T17:34:36+5:302021-05-01T17:41:15+5:30

whatsapp join usJoin us
Ajinkya Rahane contributes 30 Oxygen Concentrators to Mission Vayu | अजिंक्य रहाणे पुन्हा मदतीसाठी धावला, महाराष्ट्राला 'मिशन वायू' अंतर्गत केली ऑक्सिजनची मोठी मदत

अजिंक्य रहाणे पुन्हा मदतीसाठी धावला, महाराष्ट्राला 'मिशन वायू' अंतर्गत केली ऑक्सिजनची मोठी मदत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ajinkya Rahane: देश सध्या कोरोना महामारीच्या भीषण संकटाला सामोरा जात असताना अनेक क्रिकेटपटू मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स यानं ५० लाखांची मदत केली. तर ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली यानंही १ कोटींची मदत जाहीर केली. त्याशिवाय भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यानंही १ कोटी रुपयांची ऑक्सिजन निर्मितीसाठी मदत जाहीर केली आहे. सचिन आणि इतर काही क्रिकेटपटूंनी गेल्या वर्षीची लॉकडाऊनकाळात पुढाकार घेऊन आर्थिक हातभार लावला होता. त्यात अजिंक्य रहाणेचाही समावेश होता. आता पुन्हा एकदा अजिंक्य राहणेनं कोरोना संकटात खास महाराष्ट्रासाठी मदत जाहीर केली आहे. (Ajinkya Rahane contributes 30 Oxygen Concentrators to Mission Vayu)

देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं धुमाकूळ घातला असून ऑक्सिजनची फार मोठी कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांचे जीव गेल्याच्याही बातम्या समोर येत आहेत. त्यामुळेच ऑक्सिजन निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी अनेकजण पुढे येत आहेत. अजिंक्य राहणेनं 'मिशून वायू' अंतर्गत ३० ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्सची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे हे ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स खास महाराष्ट्रासाठी वापरण्यात येणार असून ज्या ठिकाणी आवश्यकता आहे अशा जिल्ह्यांना पुरविण्यात येणार आहेत. 

'महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर'च्यावतीनं (एमसीसीआयए) ट्विटकरुन अजिंक्य राहणेनं केलेल्या मदतीबाबत आभार व्यक्त करण्यात आले आहेत. "मिशन वायू अंतर्गत अजिंक्य रहाणेनं केलेल्या ३० ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्सच्या मदतीसाठी आम्ही त्याचे आभारी आहोत. हे ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स महाराष्ट्रातील सर्वाधिक बाधित जिल्ह्यांना पुरविण्यात येतील", असं ट्विट एमसीसीआयएनं केलं आहे. 

यंदाच्या आयपीएलमध्ये अजिंक्य रहाणेला आतापर्यंत केवळ दोन सामने खेळता आले आहेत. इतर सामन्यांमध्ये तो संघाबाहेरच बसून आहे. पण तो मैदानात नसला तरी सामाजिक कार्यात सहभाग घेऊन त्यानं सामाजिक जाण राखत सर्वांची मनं जिंकली आहेत. रहाणेनं आयपीएलमध्ये आतापर्यंत १५० सामने खेळले असून यात १२१.३४ च्या स्ट्राइक रेटनं जवळपास ४ हजार धावा केल्या आहेत. 
 

Web Title: Ajinkya Rahane contributes 30 Oxygen Concentrators to Mission Vayu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.