भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) हा क्रिकेट विश्वातील आदर्श खेळाडूंपैकी एक आहे. आपल्या नेतृत्वकौशल्याच्या जोरावर त्यानं ऑस्ट्रेलियात २-१ असा कसोटी मालिका विजय मिळवून इतिहास घडवला. त्यामुळे मायदेशात परतल्यानंतर अजिंक्यचे जंगी स्वागत केले गेले. मुंबईतील त्याचा राहत्या घरी ढोल-ताशांच्या गजरात, रेड कार्पेट अंथरून त्याचं स्वागत केलं गेलं. यावेळी त्याच्यासमोर कांगारू केक ( Kangaroo Cake) ठेवण्यात आला, परंतु त्यानं तो कापण्यास नकार दिला. त्याच्या या कृतीनं पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकली. Fact Check : किरॉन पोलार्डच्या गाडीचा भीषण अपघात; मुंबई इंडियन्सच्या खेळाडूच्या निधनाची चर्चा
संकटात असलेल्या टीम इंडियाचे नेतृत्व सक्षमपणे सांभाळून अजिंक्यनं सर्वांची मनं जिंकली. मेलबर्न कसोटीत खणखणीत शतक झळकावून त्यानं अन्य सहकाऱ्यांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले. त्यानंतर युवा गोलंदाजांच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहून त्यांच्याकडून चांगली कामगिरी करून घेतली. मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी शेरेबाजी होत असताना हुल्लडबाज प्रेक्षकांना हिस्कावून लावेपर्यंत अजिंक्यनं सामना थांबवला. रवींद्र जडेजामुळे धावबाद झाल्यानंतरही रागावण्याऐवजी अजिंक्य त्याच्याजवळ गेला आणि त्याला हताश होऊ नको, असा सल्ला दिला. त्यामुळेच मुंबईत त्याचे शाही स्वागत झाले. ऑस्ट्रेलियन खेळाडूकडून अजिंक्य रहाणेच्या खिलाडूवृत्तीचं कौतुक; लिहिली भारी पोस्ट!
समालोचक हर्षा भोगले यांच्यासोबत बोलताना अजिंक्यनं त्या कृतीबाबत सांगितले. प्रतिस्पर्धी संघाबद्दल मनात आदर आहे आणि निकाल काही लागला असता तरी तो कमी झाला नसता, असे अजिंक्यने सांगितले. तो म्हणाला,''कांगारू हा त्यांचा राष्ट्रीय प्राणी आहे. त्यामुळे मला तो केक कापून त्यांचा अपमान करायचा नव्हता. तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्धींनाही आदर दिला पाहिजे. तुम्ही जिंका किंवा ऐतिहासिक कामगिरी करा, प्रतिस्पर्धींप्रती आदर कायम राहिला हवा. त्यामुळे मी तो केक न कापण्याचा निर्णय घेतला. '' ५ महिने, २ देश अन् ८ शहरं; लेकिला कुशीत घेत अजिंक्य रहाणेनं लिहीला हृदयस्पर्शी मॅसेज!