भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) शनिवारी पंतप्रधान नागरिक सहकार्य आणि आपत्कालीन परिस्थिती निधीत 51 कोटींची मदत जाहीर केली. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेनेही कोरोना व्हारयसशी मुकाबला करण्यासाठी सरकारच्या मदतीला पुढाकार घेतला आहे. रहाणेनं महाराष्ट्र राज्य संघटनेच्या मुख्यमंत्री सहाय्य निधीत 10 लाखांची मदत जाहीर केली आहे.
रहाणेच्या आधी सचिन तेंडुलकर आणि सुरेश रैना यांनी अनुक्रमे 50 व 52 लाखांची मदत केली आहे. यापूर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेही गरजूंना 50 लाख किमतीचे तांदुळ दान केले आहेत. माजी सलामीवीर गौतम गंभीरनेही त्याच्या खासदारकी फंडातून 50 लाख दिल्ली सरकारला दिले आहेत. इरफान व युसूफ पठाण बंधुंनीही 4000 मास्कचे वाटप केले आहेत.
इंडियन प्रीमिअर लीगच्या लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघानं रहाणेला राजस्थान रॉयल्सकडून आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.