Ajinkya Rahane, Ranji Trophy : टीम इंडियाचा अनुभवी मुंबईकर क्रिकेटपटू (Mumbaikar Cricketer) अजिंक्य रहाणे हा खराब फॉर्मशी झगडत आहे. मागील दोन वर्षांत अजिंक्यला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. त्यामुळे निवड समितीने त्याला रणजी खेळण्याचा सल्ला दिला होता. तसेच, त्याला श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघातून (Team India) वगळण्यात आले. त्यामुळे रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेत पुनरागमन करणाऱ्या अजिंक्यने पहिल्या सामन्यात दमदार शतक ठोकलं. पण दुसऱ्याच सामन्यात त्याची खराब कामगिरी पाहायला मिळाली.
अजिंक्य मुंबईच्या संघाकडून खेळत आहे. गोवा विरूद्धच्या रणजी सामन्यात मुंबईची अवस्था २ बाद ३० अशी झाली होती. त्यावेळी अजिंक्य रहाणे मैदानात आला. गेल्या सामन्यातील शतकवीर असल्याने अजिंक्यकडून दमदार खेळीची अपेक्षा होती. पण अवघ्या तीन चेंडूंचा सामना करत तो शून्यावर माघारी परतला. गेल्या सामन्यात मुंबईची ३ बाद ४४ धावा अशी होती. त्यावेळी अजिंक्य व सर्फराज खान यांनी डाव सावरला होता. दोघांनी चौथ्या विकेटसाठी दीडशतकी भागीदारी केली होती. तीच किमया अजिंक्य या डावातही करेल अशी अपेक्षा चाहत्यांना होती. पण चाहत्यांचा अपेक्षा भंग झाला.
अजिंक्य रहाणेचा आफ्रिका दौरा
अजिंक्य रहाणेला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर ६ डावांत केवळ १३६ धावा करता आल्या. तीन सामन्यांच्या मालिकेत त्याने केवळ १ अर्धशतक झळकावलं. सहा डावांमध्ये अजिंक्यच्या धावा अनुक्रमे ४८, २०, ०, ५८, ९ व १ अशा होत्या. रहाणेचं शेवटचं शतक डिसेंबर २०२० मध्ये आलं होतं. तो सामना ऑस्ट्रेलियात असून भारताने सामन्यात विजय मिळवला होता. पण त्यानंतर अजिंक्यचा फॉर्म ढेपाळला आणि त्यातून तो जरा सावरत असतानाच आज पुन्हा गोवा संघाच्या गोलंदाजांनी त्याला तीन चेंडूत भोपळाही न फोडू देता तंबूत पाठवलं.