Join us  

Ajinkya Rahane, Ranji Trophy : मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या हाती पुन्हा भोपळा! सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल

रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यातील शतकवीर अजिंक्य रहाणे दुसऱ्या सामन्यात शून्यावर परतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 5:13 PM

Open in App

Ajinkya Rahane, Ranji Trophy : भारताचा अनुभवी मुंबईकर क्रिकेटपटू (Mumbaikar Cricketer) अजिंक्य रहाणेचा खराब फॉर्म संपला असं वाटत असतानाच आज पुन्हा तो शून्यावर बाद झाला. मागील दोन वर्षांत अजिंक्यला चांगली कामगिरी करता आली नसल्याने त्याला रणजी खेळण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्याला श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी मालिकेतूनही वगळण्यात आले. त्यामुळे रहाणे रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेत मुंबईच्या संघातून खेळू लागला. पहिल्या सामन्यात दमदार शतक ठोकल्यानंतर रहाणेचं कौतुक झालं. पण दुसऱ्याच सामन्यात तो शून्यावर माघारी परतला. त्यानंतर सोशल मीडीयावर त्याला ट्रोल करत भन्नाट मीम्स शेअर करण्यात आली.

अजिंक्य मुंबईच्या संघाकडून खेळताना गोवा विरूद्धच्या रणजी सामन्यात शून्यावर बाद झाला. गेल्या सामन्यात त्याने शतक ठोकलं होतं. पण यावेळी त्याला खातंही उघडता आलं नाही. त्यानंतर सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आलं. 'खेळाबद्दल थोडा गांभीर्याने विचार कर' असा सल्ला देणारं एक मीम एका युजरने शेअर केलं. तर दुसऱ्याने '(शून्यावर बाद होणं) हाच अजिंक्य रहाणेचा खरा फॉर्म आहे. आता तो त्याच्या लयीत परतला असं म्हणूया', असी खोचक टिप्पणी केली. एका युजरने तर अजिंक्यच्या शून्यावर बाद होण्याचा पाढाच वाचला. पाहा त्यापैकी काही निवडक ट्वीट्स-

--

--

--

दरम्यान, मुंबईची अवस्था २ बाद ३० अशी झाली होती. त्यावेळी अजिंक्य रहाणे मैदानात आला. गेल्या सामन्यातील शतकवीर असल्याने अजिंक्यकडून दमदार खेळीची अपेक्षा होती. पण अवघ्या तीन चेंडूंचा सामना करत तो शून्यावर माघारी परतला. गेल्या सामन्यात मुंबईची ३ बाद ४४ धावा अशी होती. त्यावेळी अजिंक्य व सर्फराज खान यांनी डाव सावरला होता. दोघांनी चौथ्या विकेटसाठी दीडशतकी भागीदारी केली होती. तीच किमया अजिंक्य या डावातही करेल अशी अपेक्षा चाहत्यांना होती. पण चाहत्यांचा अपेक्षाभंग झाला.

अजिंक्य रहाणेचं शेवटचं शतक डिसेंबर २०२० मध्ये आलं होतं. तो सामना ऑस्ट्रेलियात असून भारताने सामन्यात विजय मिळवला होता. पण त्यानंतर इंग्लंड दौरा आणि आफ्रिका दौरा त्याच्यासाठी फारसा चांगला ठरला नाही. अजिंक्य रहाणेला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर ६ डावांत केवळ १३६ धावा करता आल्या. तीन सामन्यांच्या मालिकेत त्याने केवळ १ अर्धशतक झळकावलं. सहा डावांमध्ये अजिंक्यच्या धावा अनुक्रमे ४८, २०, ०, ५८, ९ व १ अशा होत्या. त्यातून तो जरा सावरत असतानाच आज पुन्हा गोवा संघाच्या गोलंदाजांनी त्याला तीन चेंडूत भोपळाही न फोडू देता माघारी धाडलं. त्यामुळे मुंबईचा पहिला डावही स्वस्तात आटोपला.

टॅग्स :रणजी करंडकअजिंक्य रहाणेमुंबईभारतीय क्रिकेट संघ
Open in App