Join us  

विराट कोहलीपाठोपाठ मराठमोळा अजिंक्य रहाणेही चमकला; दुलीप ट्रॉफीत झळकावले शतक

मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने शानदार शतक झळकावून जोरदार पुनरागमन केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2022 7:23 PM

Open in App

नवी दिल्ली : आशिया चषकात (Asia Cup 2022) भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) शानदार शतक झळकावले. अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीतील ७१ वे शतक झळकावून इतिहास रचला आहे. लक्षणीय बाब म्हणजे विराटने तब्बल १,०२१ दिवसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक ठोकले आहे. विराट कोहली मागील मोठा कालावधी खराब फॉर्मचा सामना करत होता मात्र अफगाणिस्तानविरूद्धच्या शतकी खेळीमुळे त्याने चाहत्यांना खुशखबर दिली आहे. आशिया चषकाचा थरार रंगला असताना मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) देखील शतक ठोकून सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

दरम्यान, अजिंक्य रहाणेला खराब फॉर्ममुळे भारतीय कसोटी संघाचे उपकर्णधारपद गमवावे लागले आणि नंतर त्याला संघातून देखील वगळण्यात आले. यापूर्वी इंग्लंड दौऱ्यावर रहाणे असणार अशी क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली होती मात्र त्या आधीच त्याला दुखापत झाली. आता दुखापतीतून सावरल्यानंतर रहाणेने जोरदार कमबॅक केला आहे. रहाणे दुलिप ट्रॉफीमध्ये वेस्ट झोन संघाचा कर्णधार आहे. त्याने खेळाच्या दुसऱ्याच दिवशी शतक झळकावले. रहाणेशिवाय यशस्वी जैस्वालनेही दुहेरी शतक झळकावले.

यशस्वी जैस्वाल आणि अजिंक्य रहाणे यांनी नॉर्थ ईस्ट यांच्याविरूद्ध आक्रमक पवित्रा घेत शानदार फलंदाजी केली. वेस्ट झोनच्या संघाने पहिल्या दिवशी टी ब्रेकपर्यंत १ बळी गमावून ४७१ एवढी धावसंख्या उभारली होती. टी ब्रेकपर्यंत कर्णधार अजिंक्य रहाणे १३८ आणि यशस्वी जैस्वाल २०९ धावांवर नाबाद खेळत होते. 

रहाणेने झळकावले शतक अजिंक्य रहाणेने शानदार खेळी दाखवून भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. खराब फॉर्ममुळे सुरूवातीला अजिंक्य रहाणेला श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेला मुकावे लागले होते. आयपीएल २०२२ मधून दुखापतीमुळे त्याला बाहेर व्हावे लागले होते. मात्र आता मोठ्या विश्रांतीनंतर रहाणे दुलिप ट्रॉफीमध्ये शानदार लयनुसार फलंदाजी करत आहे. रहाणेने भारतासाठी आतापर्यंत एकूण ८२ कसोटी सामने खेळले असून ४,९३१ धावा केल्या आहेत. यामध्ये १२ शतक आणि २५ अर्धशतकांचा समावेश आहे. 

 

टॅग्स :अजिंक्य रहाणेविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय
Open in App