अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा यांच्याबाबत BCCI चा कठोर निर्णय; सूर्यकुमार, शुबमन यांचे प्रमोशन निश्चित!

A+ आणि A या दोन श्रेणी आहेत जेथे खेळाडू एकतर सर्व-स्वरूपात नियमित असतात किंवा किमान कसोटीमध्ये व मर्यादित षटकांच्या दोनपैकी एक फॉरमॅटमध्ये असतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 04:08 PM2022-12-12T16:08:07+5:302022-12-12T16:09:00+5:30

whatsapp join usJoin us
Ajinkya Rahane, Ishant Sharma likely to lose central contracts, Suryakumar Yadav, Shubman Gill set for promotion in BCCI new Central Contracts  | अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा यांच्याबाबत BCCI चा कठोर निर्णय; सूर्यकुमार, शुबमन यांचे प्रमोशन निश्चित!

अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा यांच्याबाबत BCCI चा कठोर निर्णय; सूर्यकुमार, शुबमन यांचे प्रमोशन निश्चित!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बीसीसीआय आपल्या वार्षिक केंद्रीय करारातून जानेवारी २०२२ पासून कसोटी संघातून बाहेर असलेल्या अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) आणि इशांत शर्मा ( Ishant Sharma) या कसोटी स्पेशालिस्ट खेळाडूंना काढून टाकण्याची शक्यता आहे, तर २०२२-२३ हंगामाची नव्या केंद्रिय करारात शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांना पदोन्नती मिळू शकते. येत्या २१ डिसेंबरला BCCI च्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. ट्वेंटी-२० स्पेशालिस्ट सूर्यकुमारयला C मधून B गटात बढती मिळण्याची शक्यता आहे.  

ICC WTC 2021-23 Points Table : पाकिस्तान कसोटी वर्ल्ड कप फायनलच्या शर्यतीतून OUT! चौघांच्या शर्यतीत भारत कसं जुळवणार गणित?

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणाऱ्या या बैठकीत १२ महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जाणार आहेत. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि बांगलादेश दौऱ्यावरील वन-डे मालिकेतील भारतीय संघाच्या कामगिरीचा आढावा हा अजेंडाचा भाग नाही, परंतु अध्यक्षांना आवश्यक वाटल्यास, त्यावर चर्चा केली जाऊ शकते. एपेक्स कौन्सिल व्ही जयदेवनसाठीच्या पेमेंटला देखील मान्यता देईल. ज्यांचा पाऊस-नियम फॉर्म्युला एका दशकाहून अधिक काळ देशांतर्गत व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये वापरला जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर डकवर्थ-लुईस- पद्धतीचा (DLS) वापर केला जातो, तर VJD चा वापर मुश्ताक अली ट्वेंटी-२०, विजय हजारे ट्रॉफी आणि पूर्वीच्या देवधर ट्रॉफी आणि चॅलेंजर ट्रॉफीसाठी केला जातो. 

अजेंड्यातील प्रमुख बाबींपैकी एक म्हणजे वरिष्ठ पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंचा "रिटेनरशिप कॉन्ट्रॅक्ट"वर चर्चा... माजी उपकर्णधार रहाणे आणि वेगवान गोलंदाज इशांत, जे भारतीय संघातून बराच काळ बाहेर आहेत, त्यांना नव्या यादीतून वगळण्यात येणार असल्याचे समजते. यष्टिरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाला देखील यादीतून वगळण्यात येईल, कारण या वर्षाच्या सुरुवातीला त्याला भारतीय संघात पुन्हा निवडले जाणार नाही असे सांगण्यात आले होते. बीसीसीआयच्या करारात A + यादीतील खेळाडूला ७ कोटी, A यादीतील खेळाडूला ५ कोटी, B व C गटातील खेळाडूंना अनुक्रमे ३ व १ कोटी पगार दिला जातो.

A+ आणि A या दोन श्रेणी आहेत जेथे खेळाडू एकतर सर्व-स्वरूपात नियमित असतात किंवा किमान कसोटीमध्ये व मर्यादित षटकांच्या दोनपैकी एक फॉरमॅटमध्ये असतात. B गटातील खेळाडू किमान दोन फॉरमॅट खेळतो, तर C हा प्रामुख्याने एकाच फॉरमॅटमध्ये खेळतो. सूर्यकुमार यादव सध्या C गटात आहे आणि मागील वर्षभरातील त्याची कामगिरी उल्लेखनीय झाली आहे. त्याला B गटात प्रमोशन दिले जाऊ शकते किंवा A गटातही तो येऊ शकतो. आयसीसी ट्वेंटी-२० क्रमवारीत तो सध्या नंबर एकचा फलंदाज आहे. गिल कसोटी व वन डे क्रिकेटचा सदस्य आहे आणि त्यालाही C गटातून B गटात प्रमोशन दिले जाऊ शकते.

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: Ajinkya Rahane, Ishant Sharma likely to lose central contracts, Suryakumar Yadav, Shubman Gill set for promotion in BCCI new Central Contracts 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.