भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे यानं शुक्रवारी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करून शेतकऱ्यांचे कौतुक केले. राहणे नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला आहे. कोल्हापूरात आलेला पूर असो किंवा अन्य संकट रहाणेनं अनेकदा शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यानं महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसोबत शेतकऱ्यांसाठीच्या कंपनीत गुंतवणुकही केली आहे.
अजिंक्य रहाणे बनला 'शेतकरी मित्र'; महिंद्रा ग्रुपसोबत केली मोठी गुंतवणूक
रहाणेनं त्यांच्या संगमनेर येथील फार्म हाऊसवरील एक फोटो शेअर केला आहेत. त्यावर त्यानं लिहीले की,''हा संगमनेर फार्म येथील फोटो आहे आणि हा शेअर करून मी शेतकऱ्यांना कडक सलाम ठोकतो... प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शेतकरी शेती करतात आणि आपल्या सर्वांच्या धान्याची गरज पूर्ण करतात.''
काही दिवसांपूर्वी अजिंक्यनं अशाच एका शेतकाऱ्याचा व्हिडीओ पोस्ट केला होता.''कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी सर्व स्तरातून मदतीचा ओघ येत आहे. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार आपल्याला घरीच राहण्याची कळकळीची विनंती करत आहेत. त्यांची ही विनंती योग्य आहे, परंतु गरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. मी
शेतकरी आहे आणि मी आर्थिक मदत करू शकत नाही. पण, माझी दोन एकर केळीची शेती आहे. त्यामुळे माझ्या शेतातील केळी काढणीला आली आहेत आणि ही केळी मी त्या गरजूंनी देऊ इच्छितो. शासनाला माझी विनंती आहे की त्यांनी ही केळी घेऊन जावी आणि गरिबांना द्यावी. किमान त्यांचं एक वेळेची भूक मिटेल,'' असे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यानं सांगितले. त्याच्या या पुढाकाराचं टीम इंडियाच्या कसोटी संघाचा उपकर्णधार रहाणेनं कौतुक केलं होतं.
अजिंक्यने सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra day : 'तो' खास फोटो अन् सचिन तेंडुलकरने दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
Sania Mirza ला मिळाली आनंदाची बातमी; म्हणाली, हा क्षण माझ्यासाठी खास!
Bad News : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर क्रिकेटची मोठी लीग 2020मध्ये होणार नाही
Breaking : ऑस्ट्रेलियन संघाकडून टीम इंडियाला मोठा धक्का
आर अश्विननं सांगितली Positive News; ही बातमी तुम्हाला नक्कीच दिलासा देईल
WWE सुपरस्टार जॉन सीनानं Rishi Kapoor यांना वाहिली श्रद्धांजली; फोटो पाहून व्हाल भावुक
कोरोनामुळे क्रिकेट स्पर्धा नाही, तरीही टीम इंडियानं का गमावलं अव्वल स्थान?
कपिल देव अन् इम्रान खान यांच्या आसपासही नाही Hardik Pandya; अब्दुल रझाकचं रोखठोक उत्तर
Web Title: Ajinkya Rahane praised the farmers, post message for all svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.