Join us  

मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सांगितलं स्फोटक खेळीचं रहस्य; कर्णधार धोनीचंही केले कौतुक

Ajinkya Rahane and MS Dhoni : आयपीएलमध्ये काल झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने यजमान कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 12:10 PM

Open in App

ajinkya rahane on kkr vs csk । कोलकाता : आयपीएलमध्ये (IPL 2023) काल झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने यजमान कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. अजिंक्य रहाणेने केलेल्या स्फोटक खेळीच्या जोरावर सीएसकेने धावांचा डोंगर उभारला. रहाणेने २९ चेंडूत ७१ धावांची नाबाद खेळी केली. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ४ बाद २३५ धावा केल्या. २३६ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरचा संघ केवळ १८६ धावा करू शकला. शानदार अर्धशतकामुळे अजिंक्य रहाणेला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. 

सामन्यानंतर रहाणेने म्हटले, "एक स्पष्ट मानसिकता आहे, आणखी काही नाही. तुमची मानसिकता योग्य असेल तर तुम्ही काहीही करू शकता आणि म्हणूनच मी ही खेळी करू शकलो. तसेच या हंगामापूर्वी माझी तयारी देखील चांगली होती. आज चेंडू थोडा उशीरा येत होता आणि खेळपट्टी थोडी चिकट होती. एका बाजूची सीमारेषा सुद्धा खूपच लहान होती. मला इथे केवळ सकारात्मक राहायचे होते." धोनीचे केले कौतुकतसेच मी या हंगामात माझ्या सर्व खेळींचा आनंद लुटला आहे आणि मला वाटते की माझी सर्वोत्कृष्ट खेळी येणे अद्याप बाकी आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खूप काही शिकायला मिळाले. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघासाठी खेळणे आणि आता चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळणे, ही अविस्मरनीय बाब आहे. एमएस धोनी अशी व्यक्ती आहे ज्याचे तुम्हाला नेहमी ऐकायला आवडेल, असे रहाणेने अधिक सांगितले.

रहाणेची स्फोटक खेळीअजिंक्य रहाणेने या हंगामात ५ सामन्यांमध्ये १९९ च्या स्ट्राईक रेटने २०९ धावा केल्या आहेत. यामध्ये २ अर्धशतकी खेळींचा समावेश आहे. खरं तर रहाणे मागील १५ महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. जानेवारी २०२२ मध्ये त्याने शेवटच्या वेळी भारतासाठी कसोटी सामना खेळला होता.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनीअजिंक्य रहाणेकोलकाता नाईट रायडर्स
Open in App