Ajinkya Rahane County Stint End Early Due To Niggles Injury : भारतीय संघाबाहेर असणारा मध्यफळीतील अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेइंग्लंडमध्ये आपला जलवा दाखवताना दिसला. घराबाहेर पडत त्याने इंग्लंडमधील देशांतर्गत स्पर्धेतील वनडे कप आणि काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत लीसेस्टरशायरकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याचा इथंला प्रवास अर्ध्यावरच संपला आहे.
अन् परदेशात तोऱ्यात खेळणाऱ्या अजिंक्य रहाणेंच्या आडवं गेल दुखापतीचं 'मांजर'
मांजर आडवं गेलं की काम रखडते, असा एक समज आपल्याकडे आहे. क्रिकेटर्सच्या बाबतीत दुखापत ही मांजर आवडवे गेल्यासारखी असते. दुखापतीनं डोक वर काढलं की, फार्मात असलेल्या गड्यावर माघार घेण्याची वेळ येते. हीच गोष्ट अजिंक्य रहाणेच्या बाबतीत घडलीये. रहाणेला अनेक दुखापतीनं त्रस्त केल्यामुळे मेडिकल टीमनं त्याला न खेळण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तो लीसेस्टरशायरकडून अंतिम दोन सामन्याचा भाग असणार नाही. हे दोन सामने नॉर्थम्पटनशायर आणि डर्बीशायर यांच्याविरोध होणार आहेत.
मी पुन्हा येईन! अजिंक्य रहाणेची खास पोस्ट चर्चेत
दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतलेल्या अजिंक्य रहाणे याने एक्स अकाउंटवरुन (पूर्वीचे ट्विटर) एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यानं पोस्टमध्ये लिहिलंय की, लीसेस्टरशायरसोबत घालवलेला वेळ माझ्यासाठी खूप खास होता. आम्ही सर्वोत्तम क्रिकेट खेळलो. संघात पुढील हंगामासाठी अनेक उद्योत्मुख खेळाडू आहेत. नव्या सहकाऱ्यांसह कोचसोबत खेळाचा दर्जा सुधारण्यासाठीचा प्रवास आनंददायी होता. प्रत्येकानं माझं खास स्वागत केलं. भविष्यात मला पुन्हा या क्लबकडून खेळणं आवडेल, असे म्हणत त्याने मी पुन्हा येईन, अशी डरकाळीच सोशल मीडियावर फोडली आहे.
कशी राहिली अजिंक्य रहाणेची परदेशातील कामगिरी?
अजिंक्य रहाणे याने लीसेस्टरशायरसाठी वनडे कप स्पर्धेत १० सामने खेळले. यात ४२ च्या सरासरीने त्याने ३७८ धावा काढल्या. ७१ या सर्वोच्च खेळीसह त्याच्या भात्यातून ४ अर्धशतके पाहायला मिळाली. याशिवाय काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन २ मधील ३ सामन्यातील ६ डावात त्याने २०२ धावा केल्या. यात १०२ ही त्याची सर्वोच्च खेळी राहिली.