Join us  

अजिंक्य रहाणेचे सलग दोन 'भोपळे'; भारतीय संघातील पुनरागमनाच्या आशा मावळल्या

अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) आगामी इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पुनरागमनासाठी प्रयत्नशील आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 12:31 PM

Open in App

मागच्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरची कसोटी खेळणारा अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) आगामी इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पुनरागमनासाठी प्रयत्नशील आहे. भारतीय संघाच्या मधल्या फळीतील ऐकेकाळी महत्त्वाचा फलंदाज असलेल्या अजिंक्यचे पुनरागमन संकटात सापडले आहे. अजिंक्य सध्या रणजी करंडक स्पर्धेत ( Ranji Trophy 2024) मुंबईचे नेतृत्व सांभाळत आहे, परंतु त्याला सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद व्हावे लागले आहे.

केरळ विरुद्ध सुरू असलेल्या रणजी सामन्यात कर्णधार अजिंक्य पहिल्याच चेंडूवर भोपळ्यावर बाद झाला. संजू सॅमसनने स्टम्पिंग करून अजिंक्यला बाद केले. बसील थम्पी व विश्वेश्वर सुरेश यांच्या माऱ्यासमोर मुंबईचे ३ फलंदाज ५४ धावांवर माघारी परतले. थम्पीने पहिल्याच षटकात जय बिस्ताला पायचीत केले आणि त्यानंतर पुढील चेंडूवर त्याने अजिंक्यची विकेट काढली. सुरेशने मुंबईला तिसरा धक्का देताना सुवेध पारकरचा ( १८) काटा काढला. यापूर्वी अजिंक्य आंध्र प्रदेशविरुद्धच्या लढतीत शून्यावर बाद झाला होता.  मुंबई ब गटात दोन सामन्यांत १४ गुणांसह आघाडीवर आहे. 

भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे आणि पहिल्या दोन कसोटीसाठी संघ जाहीर करण्यात आला आहे. अजिंक्य उर्वरित कसोटीसाठी भारतीय संघात पुनरागमनासाठी प्रयत्नशील आहे. पण, रणजी करंडकातील त्याचे अपयश त्या आड येत आहे. त्याला संघात परतायचे असेल तर रणजी करंडक स्पर्धेत दमदार कामगिरी करावी लागेल.  

पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद यादव. , मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) आणि आवेश खान या खेळांडूचा समावेश आहे

IND vs ENG Test Series २५ ते २९ जानेवारी - हैदराबाद, सकाळी ९.३० वाजल्यापासून०२ ते ०६ फेब्रुवारी - विशाखापट्टणम, सकाळी ९.३० वाजल्यापासून१५ ते १९ फेब्रुवारी - राजकोट, सकाळी ९.३० वाजल्यापासून२३ ते २७ फेब्रुवारी - रांची, सकाळी ९.३० वाजल्यापासून७ ते ११ मार्च - धर्मशाला, सकाळी ९.३० वाजल्यापासून

टॅग्स :अजिंक्य रहाणेभारत विरुद्ध इंग्लंडरणजी करंडक