मुंबई : अजिंक्य रहाणे हा भारतीय संघाचा तिसरा सलामीवीर असल्याचे भारतीय कर्णधार विराट कोहली याने आज स्पष्ट केले. त्यासोबतच स्पष्ट झाले, की अजिंक्य रहाणे हा न्यूझीलंडविरोधातील एकदिवसीय सामन्यात खेळू शकणार नाही.
शिखर धवन आणि रोहित शर्मा हे भारताचे नियमित सलामीवीर आहेत. धवनच्या अनुपस्थितीत रहाणेने डावाची सुरुवात केली होती. त्यात त्याने पाच सामन्यांत सलग चार अर्धशतके झळकावली आहेत. भारताने ही मालिका ४-१ अशी जिंकली. कोहलीने सांगितले की, ‘‘रहाणेने तिसरा सलामीवीर म्हणून निश्चितच संधीचा लाभ घेतला आहे. त्यासोबतच के. एल. राहुलदेखील सलामीच्या शर्यतीत आहे. मात्र चार खेळाडू जेव्हा एकाच स्थानासाठी खेळतात तेव्हा त्यातील एकाला संघाबाहेर व्हावे लागेल. कारण या जागी फक्त दोनच खेळाडू खेळू शकतात.
रहाणेला मधल्या फळीत खेळवण्यास इच्छुक नसल्याचे कोहलीने सांगितले. राहुलऐवजी दिनेश कार्तिकला संघात स्थान देण्यात आले आहे. राहुलदेखील सलामीलाच खेळतो. काही वेळा रहाणेला मधल्या फळीत खेळावे लागले. तसे त्याच्यासोबत होऊ नये.’’ गोलंदाजीबाबत बोलताना कोहली म्हणाला, की आम्हाला विश्वचषकाआधी सर्वोत्तम गोलंदाजी संयोजन शोधावे लागेल. आम्ही या दोघांना एकत्र खेळवण्याचा विचार करत नव्हतो, मात्र त्यांनी खूपच चांगला खेळ केला म्हणूनच प्रत्येक सामन्यात ते खेळत आहेत.
Web Title: Ajinkya Rahane was the third Indian opener, captain Virat Kohli did
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.