भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) त्याच्या आजीला भेटण्यासाठी संगमनेरला जाणार होता. मात्र, ही त्याची इच्छा अधुरीच राहिली आहे. अजिंक्यचा आजीचे निधन झाले आहे. (Ajinkya Rahane lost his grandmother today. The one he had spoken about in the interview with Bala Saheb ji Thorat in LMOTY 2020)
'लोकमत'च्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या सोहळ्याला अजिंक्य रहाणे आला होता. यावेळी त्याने आजीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. ''कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सुधारणा झाली की मी संगमनेरला जाणार आहे. माझी आजी तिथे असते, खूप दिवस झाले तिलाही भेटलेलो नाही. त्यामुळे वेळ मिळाला की, मी नक्की संगमनेरला येईन.'' असे तो म्हणाला होता. ऑस्ट्रेलियातून परतल्यानंतर तुझ्या सोसायटीनं जंगी स्वागत केलं; पण आता संगमनेरलाही तुझं स्वागत करायचं आहे, तर कधी वेळ देशील? या प्रश्नावर त्याने हे उत्तर दिले होते. आज अजिंक्यच्या संगमनेर येथील आजीचे वृद्धापकाळाने निधन झाले.
लॉकडाऊनमुळे मला माझ्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवता आला. आम्ही वर्षातील ९-१० महिने बाहेर असतो. त्यामुळे कोरोनामुळे आम्हाला आमच्या घरच्यांसोबत खूप वेळ घालवता आला. आई-बाबा, पत्नी आणि मुलीला वेळ देता आला. माझ्या मुलीसोबतचा वेळ खूप आनंददायी होता. तिच्यामध्ये झालेले बदल जवळून अनुभवता आले, असे अजिंक्य म्हणाला होता.
LMOTY 2020: आजीला भेटायला संगमनेरला जाणार आहे! अजिंक्य रहाणेला येतेय आठवण
Web Title: Ajinkya Rahane's Grand mother Passed away in Sangamner
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.