यशस्वी जैस्वालला स्लेजिंग करणं पडलं महागात; कर्णधार अजिंक्य रहाणेने केलं मैदानातून बाहेर, पाहा VIDEO

दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये अजिंक्य रहाणेच्या साउथ झोनच्या संघाने विजय मिळवला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 02:14 PM2022-09-25T14:14:43+5:302022-09-25T14:17:22+5:30

whatsapp join usJoin us
Ajinkya Rahane's South Zone side have won the Duleep Trophy final, Yashasvi Jaiswal out of match for 7 overs due to sledging | यशस्वी जैस्वालला स्लेजिंग करणं पडलं महागात; कर्णधार अजिंक्य रहाणेने केलं मैदानातून बाहेर, पाहा VIDEO

यशस्वी जैस्वालला स्लेजिंग करणं पडलं महागात; कर्णधार अजिंक्य रहाणेने केलं मैदानातून बाहेर, पाहा VIDEO

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफीच्या फायनलच्या सामन्यात साउथ झोनच्या संघाने वेस्ट झोनचा २९४ धावांनी पराभव केला. ५२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट झोनचा संघ २३४ धावांवर सर्वबाद झाला. फायनलच्या सामन्याचा अखेरचा दिवस अनेक वादांमुळे चर्चेत राहिला. साउथ झोनच्या संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने आपल्या संघातील युवा खेळाडू यशस्वी जैस्वालला मैदानातून बाहेर केले. खरं तर यशस्वी जैस्वालच्या अशोभनीय वृत्तीमुळे रहाणेला (Ajinkya Rahane) हे पाऊल उचलावे लागले.

यशस्वी जैस्वाल सतत साउथ झोनच्या फलंदाजांची खासकरून रवी तेजाची स्लेजिंग करत होता. पंचांनी यशस्वीला दोन-तीन वेळा इशाराही दिला. मात्र डावाच्या ५७व्या षटकात यशस्वीने पुन्हा एकदा तेच केले तेव्हा पंचांनी आवरले नाही आणि कर्णधार रहाणेशी त्याने बराच वेळ चर्चा केली, त्यानंतर यशस्वीला मैदान सोडावे लागले. विशेष बाब म्हणजे पंचांनी सब्स्टीट्यूट फिल्डरची परवानगी दिली नाही, ज्यामुळे रहाणेच्या संघाला काही षटके १० खेळाडूंसह मैदानावर राहावे लागले. मात्र, २० वर्षीय जैस्वाल तब्बल ७ षटकांनंतर मैदानात परतला.

जैस्वालने ठोकले दुहेरी शतक
दुलीप ट्रॉफीच्या फायनलच्या सामन्यात यशस्वी जैस्वालने साउथ झोनसाठी दुसऱ्यांदा दुहेरी शतक झळकावले होते. यशस्वीने ३२३ चेंडूचा सामना करताना २६५ धावा केल्या, ज्यामध्ये ३० चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. सरफराज खानने देखील नाबाद १२७ धावा करून यशस्वीला साथ दिली. दोघांच्या शानदार खेळीमुळे वेस्ट झोनच्या संघाने ४ बाद ५८५ धावांवर दुसरा डाव घोषित केला होता. 

साउथ झोनची आघाडी 
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वेस्ट झोनने आपल्या पहिल्या डावात २७० धावा केल्या होत्या. वेस्ट झोनकडून हेत पटेलने सर्वाधिक ९८ धावा केल्या होत्या, तर जयदेव उनादकटने ४७ आणि श्रेयस अय्यरने ३७ धावांची खेळी केली होती. साउथ झोनसाठी साई किशोरने सर्वाधिक ५ बळी पटकावले. प्रत्युत्तरात साउथ झोनने आपल्या पहिल्या डावात ३२७ धावा केल्या होत्या, ज्यामुळे त्यांना ५७ धावांची आघाडी मिळाली होती. साउथ झोनकडून बाबा इंद्रजीतने १२५ चेंडूंचा सामना करत ११८ धावांची खेळी केली होती. 

 

Web Title: Ajinkya Rahane's South Zone side have won the Duleep Trophy final, Yashasvi Jaiswal out of match for 7 overs due to sledging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.