ठळक मुद्देमुंबई ट्वेन्टी-20 लीगच्या लिलावाला काही क्षणांत सुरुवात
मुंबई : मुंबईला क्रिककेटची पंढरी समजली जाते. पण या पंढरीत क्रिकेटची लीग सुरु व्हायला जास्तच कालावधी गेला. पण बहुप्रतीक्षित लीगच्या लिलावाला काही क्षणांमध्ये सुरुवात होणार आहे. या लीगच्या लिलावासाठी अजिंक्य रहाणे, शार्दुल ठाकूर, पृथ्वी शॅा हे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले खेळाडू लक्षवेध ठरणार आहे. त्याचबरोबर यंदाच्या मोसमात रणजी आणि विजय हजारे करंडक स्पर्धेत धावांची टांकसाळ उघडणारा सिद्धेश लाडला किती मागणी मिळते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले असेल.
ही लीग 11 ते 21 मार्च या कालावधीमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेत एकूण सहा संघांचा सहभाग आहे. त्याचबरोबर संदीप पाटील, बलविंदर सिंग संधू, लालचंद राजपूत आणि विनोद कांबळी यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी करणारे माजी क्रिकेटपटू मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. त्याचबरोबर समीर दिघे, अतुल रानडे यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. पण या लीगमध्ये आंतरराष्ट्रीय किती खेळाडू खेळतील, याबाबत संदिग्धता आहे.
काही दिवसांमध्ये श्रीलंकेमध्ये तिरंगी क्रिकेट मालिका होणार आहे. या स्पर्धेतील भारतीय संघात मुंबईच्या रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर यांचा समावेश आहे. रोहितने या लीगमधील समावेशाबद्दल अजूनही आपण उपलब्ध आहोत किंवा नाही, हे सांगितलेले नाही. शार्दुल मात्र या लिलावासाठी उपलब्ध असणार आहे. पण ही मालिका संपल्यावर मात्र शार्दुल या लीगसाठी उपलब्ध असणार आहे. अजिंक्य या लीगसाठी सुरुवातीपासून उपलब्ध असेल, असे मुंबई क्रिकेट संघटनेतील काही व्यक्तींनी सांगितले आहे. पृथ्वी शॅा हा 18 माचर्नंतर लीगसाठी उपलब्ध होऊ शकेल, असे सूत्रांनी सांगितले आहे. यंदाच्या हंगामात दमदार कामिगरी करणारा सिद्धेश लाडला लिलावात चांगली मागणी असू शकेल.
या लीगबाबत शार्दुल म्हणाला की, ही लीग म्हणजे युवा खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याचे उत्तम व्यासपीठ आहे. त्याचबरोबर या लीगमुळे मुंबईचे क्रिकेट अधिक बळकट होण्यासाठी मदत होऊ शकेल. मर्यादीत क्रिकेटमध्ये कशी कामगिरी करायची असते, हे युवा खेळाडूंना या लीगमधून शिकता येईल. त्याचबरोबर या लीगच्या कामगिरीच्या जोरावर युवा खेळाडूंना विविध संधी उपलब्ध होऊ शकतील. त्यामुळे ही लीग मुंबईच्या क्रिकेट आणि क्रिकेटपटूंसाठी फार महत्वाची ठरणार आहे.
Web Title: Ajinkya, Shardul, Siddesh, will get attention in t-20 mumabi cricket league
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.