अजित आगरकरने दिल्ली कॅपिटल्सची अचानक साथ सोडली, जाणून घ्या कारण

बीसीसीआयला निवड समितीच्या प्रमुखाचे वेतन वर्षासाठी १ कोटीपेक्षा अधिक करावे लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 10:18 PM2023-06-29T22:18:38+5:302023-06-29T22:18:51+5:30

whatsapp join usJoin us
Ajit Agarkar Quits Delhi Capitals, Know Why or Select by BCCI | अजित आगरकरने दिल्ली कॅपिटल्सची अचानक साथ सोडली, जाणून घ्या कारण

अजित आगरकरने दिल्ली कॅपिटल्सची अचानक साथ सोडली, जाणून घ्या कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय क्रिकेटसाठी टीम इंडियाच्या निवड समितीच्या प्रमुखपदाच्या स्पर्धेत असलेल्या भारताचा माजी फलंदाज अजित आगरकर असल्याचे वृत्त झळकले. त्यानंतर, काही तासांतच अजित आगरकरने तडकाफडकी आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाच्या सहायक प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. निवड समिती प्रमुख पदाच्या स्पर्धेत अजित आगरकर उतरल्यामुळे बीसीसीआयला निवड समितीच्या प्रमुखाचे वेतन वर्षासाठी १ कोटीपेक्षा अधिक करावे लागणार आहे. तर, इतर सदस्यांचे वेतनही ९० लाखांपेक्षा जास्त करावे लागेल. 

दिल्ली कॅपिटल्सचा सहायक कोच आणि कॉमेंटेटर असलेला अजित आगरकर निवड समितीच्या प्रमुख पदावरील व्यक्तीच्या पगारापेक्षा वर्षाला अधिक कमाई करतो. म्हणूनच, बीसीसीआयच्या या पदांवरील सद्यस्थितीतील पगारावरुन चर्चा होत आहे. पीटीआयने आगरकर प्रमुख निवड समितीच्या स्पर्धेत असल्याचे वृत्त बुधवारी दिले होते. त्यातच, आता दिल्ली कॅपिटल्सच्या सहायक कोच पदाचा राजीनामा दिल्यामुळे अजित आगरकरचे टीम इंडियाच्या निवड समितीतील स्थान पक्के मानले जात आहे. 

वेस्ट इंडिजच्या आगामी दौऱ्यासाठी टी-२० टीम इंडियाच्या निवडीसाठी अजित आगरकरच निवड समितीचा प्रमुख असू शकतो. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने या वृत्ताला दुजोरा दिलास असून अजित आगरकर आणि शेन वॅटसन दिल्ली कॅपिटल्सचे सहायक कोच असणार नाहीत. दिल्ली कॅपिटल्सने ट्विट केलं आहे. तुमच्यासाठी हे सदैव तुमचं घर राहिल. धन्यवाद अजित आणि वॅटसन (वाट्टो), पुढील कारकिर्दीस शुभेच्छा, असंही या ट्विटमध्ये म्हटलंय. 


दरम्यान, अजित आगरकरने २०२१ मध्येही निवड समितीच्या पदासाठी मुलाखत दिली होती. तेव्हा उत्तर क्षेत्रातून चेतन शर्मा समितीचे अध्यक्ष बनले होते. दिवंगत रमाकांत आचरेकर यांचा शिष्य असलेल्या ४५ वर्षीय अजित आगरकरने १९१ एकदिवसीय सामने, २६ कसोटी सामने आणि ४ टी-२० सामने टीम इंडियासाठी खेळले आहेत.  
 

Web Title: Ajit Agarkar Quits Delhi Capitals, Know Why or Select by BCCI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.