मुंबई - भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील महान कर्णधारांपैकी एक असलेल्या अजित वाडेकर यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाबरोबरच भारतीय क्रिकेटमधील कुशल कप्तानीचा एक अध्याय समाप्त झाला. भारतीय क्रिकेट संघाच्या प्रतिकूल काळात अजित वाडेकर यांनी 1971 साली वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौऱ्यांमध्ये कसोटी मालिकेत विजय मिळवून देण्याची ऐतिहासिक कामगिरी त्यांनी केली होती. वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत विजय मिळवून देणारे वाडेकर हे भारताचे पहिले कर्णधार होते.
1971 साली वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौऱ्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 असा विजय मिळवला होता. या दौऱ्यात अजित वाडेकर यांची कुशल कप्तानी, सुनील गावसकर व दिलीप सरदेसाई यांची फलंदाजी आणि वेंकटराघवन, बेदी, चंद्रशेखर आणि प्रसन्ना यांचा भेदक मारा भारतीय संघाच्या यशात मोलाचा ठरला होता.
त्यानंतर याच वर्षी भारतीय संघाने इंग्लंडच्या दौऱ्यामध्येही विजयाची पताका फडकवली होती. त्यावेळी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने 1-0 असा विजय मिळवला होता. त्या मालिकेत स्वत: कर्णधार अजित वाडेकर यांची फलंदाजी आणि वेंकटराघवन यांची भेदक गोलंदाजी निर्णायक ठरली होती.
Web Title: Ajit Wadekar was the first Indian captain to do so
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.