नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि त्याचे कुटुंबीय कौंटुबिक हिंसाचाराच्या प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत. युवीचा भाऊ झोरावरची पत्नी आकांक्षा शर्मानं युवी आणि त्याच्या कुटुंबीयांवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत पोलीस चौकीत तक्रार केली होती. पण, बुधवारी या प्रकरणाला नवीन वळण प्राप्त झाले. आकांक्षाने ही तक्रार मागे घेत युवी आणि त्याच्या कुटुंबीयांची माफी मागितली. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाईचे संकट टळलं...
चार वर्षांनंतर झोरावर आणि आकांक्षा यांच्यात घटस्फोट झाला. घटस्फोटाची केस सुरू असताना आकांक्षाने युवी व त्याच्या कुटुंबीयांवर कौटुंबिक हिंसाचार केल्याचे आरोप केले होते. पण, तिने अखेर युवीसह त्याच्या कुटुंबीयांची माफी मागितली. झोरावर आणि आकांक्षा यांचे लग्न जवळपास सहा महिनेच टिकले. ''आकांशा शर्मानं हे कबुल केले की तिने केलेले आरोप चुकीचे होते आणि त्याबद्दल माफी मागत तिनं तक्रार मागे घेतली आहे,''असे युवीच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.
आकांक्षाने ऑक्टोबर 2017मध्ये गुरुग्राम न्यायालयात युवी आणि त्याची आई शबनम सिंह यांच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. '' युवराजला टार्गेट करण्याच्या उद्देशानं तिनं तसं केलं होतं. तिच्या या तक्रारीमुळे युवीच्या प्रतिमेला धक्का बसला होता. पण, युवी डगमगला नाही. त्यानं सत्यासाठी लढा सुरूच ठेवला आणि अखेर तो विजयी झाला,'' असेही कुटुंबीयांनी सांगितले.
युवराज सिंग काही दिवासांतच करणार धक्कादायक खुलासाभारताचा धडाकेबाज डावखुरा फलंदाज युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण आता काही दिवसांमध्ये युवराज धक्कादायक खुलास करणार असल्याची चर्चा आहे. युवराजने भारताला बरेच विजय मिळवून दिले. 2011च्या विश्वविजयात तर युवराजचा सिंहाचा वाटा होता. कर्करोग झाल्यावरही युवराज मैदानात परतला होता. पण युवराजला मात्र निवृत्तीचा सामना खेळायला दिला नाही. त्यामुळे युवराज नाराज आहे. आपल्याला निवृत्तीचा सामना कोणामुळे खेळायला मिळाला नाही, या गोष्टीचा खुलासा युवराज येत्या काही दिवसांमध्ये करणार आहे.