IND vs PAK: "अर्शदीपवर टीका करणारे खेळाचा अपमान करत आहेत", भारताच्या माजी खेळाडूने DP बदलून केले समर्थन

यूएईच्या धरतीवर सुरू असलेली आशिया चषकाची स्पर्धा आता मुख्य टप्प्यात येऊन पोहचली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 03:59 PM2022-09-05T15:59:17+5:302022-09-05T16:00:13+5:30

whatsapp join usJoin us
Akash Chopra has changed his profile picture to support Arshdeep Singh | IND vs PAK: "अर्शदीपवर टीका करणारे खेळाचा अपमान करत आहेत", भारताच्या माजी खेळाडूने DP बदलून केले समर्थन

IND vs PAK: "अर्शदीपवर टीका करणारे खेळाचा अपमान करत आहेत", भारताच्या माजी खेळाडूने DP बदलून केले समर्थन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : यूएईच्या धरतीवर सुरू असलेली आशिया चषकाची (Asia Cup 2022) स्पर्धा आता मुख्य टप्प्यात येऊन पोहचली आहे. रविवारी झालेल्या भारत आणि पाकिस्तानच्या (IND vs PAK) सामन्यात पाकिस्तानने 5 गडी राखून शानदार विजय मिळवला. भारतीय संघाने जोरदार कमबॅक करून सामना अखेरच्या षटकापर्यंत नेला मात्र विजय मिळवण्यात अपयश आले. शेवटच्या षटकात विजयासाठी 7 धावांची आवश्यकता असताना पाकिस्तानने 1 चेंडू राखून सामना आपल्या नावावर केला. मात्र भारतीय संघाचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) आसिफ अलीचा झेल सोडला त्यामुळे त्याला टीकाकारांचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, अर्शदीप सिंगने सोडलेल्या झेलमुळेच भारताचा पराभव झाला असल्याचा सूर चाहत्यांमध्ये आहे. अशातच भारताच्या अनेक आजी माजी खेळाडूंनी अर्शदीपची पाठराखण केली आहे. माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्राने देखील अर्शदीप सिंगच्या टीकाकारांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. "कोणीच जाणूनबुजून झेल सोडत नाही. मात्र खासकरून पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात झेल सुटल्याने खेळाडू जास्त दुखावला जातो. परंतु जे कोणी युवा खेळाडू अर्शदीप सिंगकडे वेगळ्या नजरेने पाहत आहेत ते खेळाचा अपमान करत आहेत. तसेच स्वतःची समज किंवा त्यांची कमतरता उघड करत आहे", अशा शब्दांत चोप्राने अर्शदीप सिंगच्या टीकाकारांना उत्तर दिले आहे."

DP बदलून केले अर्शदीपचे समर्थन
तसेच भारतीय संघातील अनेक दिग्गजांनी अर्शदीप सिंगच्या खेळीचे कौतुक केले आहे. यामध्ये हरभजन सिंग, युवराज सिंग अशा खेळाडूंचा समावेश आहे. आकाश चोप्राने ट्विटरवरील आपला प्रोफाईल फोटो बदलून अर्शदीपचे समर्थन केले आहे. हरभजन सिंग देखील अर्शदीप सिंगच्या मदतीला धावून आला आहे. हरभजनने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "अर्शदीप सिंगवर टीका करणे थांबवा. कोणीही जाणूनबुजून झेल सोडत नाही. आम्हाला आमच्या खेळाडूंचा गर्व आहे. पाकिस्तानच्या संघाने शानदार खेळ केला. लाज वाटते अशा लोकांची जे संघाबद्दल काहीही गोष्टी बोलून आपल्याच खेळाडूंना कमी लेखतात. अर्शदीप हे सोनं आहे." हरभजन सिंगने ट्विट करून टीकाकारांना चांगलेच सुनावले आहे.   

17 व्या षटकात सुटला होता झेल
भारत आणि पाकिस्तान सामना म्हटलं की चर्चेला उधान येत असते. मात्र रविवारी झालेल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. सामन्याच्या 17 व्या षटकात अर्शदीप सिंगने पाकिस्तानच्या आसिफ अलीचा सोप्पा झेल सोडल्याने त्याच्यावर पातळी सोडून टीका केली जात आहे. आसिफ अलीने झेल सुटल्याचा फायदा घेत चौकार आणि षटकार मारला. त्यामुळे नेटकऱ्यांनी अर्शदीप सिंगवर निशाणा साधण्यास सुरूवात केली. 


 


 

Web Title: Akash Chopra has changed his profile picture to support Arshdeep Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.