Virat Kohli:"गोलंदाज आता विराटला पूर्वीसारखे घाबरत नाहीत", माजी भारतीय क्रिकेटपटूचे मोठे विधान

विराट कोहली सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 01:24 PM2022-08-24T13:24:00+5:302022-08-24T13:25:38+5:30

whatsapp join usJoin us
Akash Chopra says that bowlers are not afraid of Virat Kohli now like before | Virat Kohli:"गोलंदाज आता विराटला पूर्वीसारखे घाबरत नाहीत", माजी भारतीय क्रिकेटपटूचे मोठे विधान

Virat Kohli:"गोलंदाज आता विराटला पूर्वीसारखे घाबरत नाहीत", माजी भारतीय क्रिकेटपटूचे मोठे विधान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli)  आगामी आशिया चषकासाठी (Asia Cup 2022) सज्ज झाला आहे. मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा किंग कोहली मैदानात दिसणार आहे. आशिया चषक स्पर्धा सुरू होण्यास आता अवघे काही दिवस उरले आहेत. यूएईच्या (UAE) धरतीवर पार पडणाऱ्या या स्पर्धेसाठी संघ दाखल होण्यास देखील सुरूवात झाली आहे. मात्र विराटसाठी ही स्पर्धा मोठी परीक्षा असणार आहे, कारण मागील मोठ्या कालावधीपासून कोहलीला एकही मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे आशिया चषकातून तो त्याच्या टीकाकांराना सडेतोड उत्तर देणार का हे पाहण्याजोगे असेल. 

दरम्यान, भारतीय संघाचा माजी क्रिकेटर आकाश चोप्राने (Akash Chopra) ESPNCricinfo मध्ये लिहलेल्या एका आर्टिकलमध्ये विराटबाबत भाष्य केले आहे. ज्यामध्ये त्याने विराटचा क्लास आणि स्किल्सचे खासकरून कौतुक केले आहे. मात्र जागतिक स्तरावर विराटचा दबदबा कमी झाल्याचे आकाश चोप्राने म्हटले. 

विराटबद्दल पहिल्यासारखी भीती उरली नाही 
चोप्राने लिहले, "विराट कोहलीचा 'क्लास आणि स्किल्स'बद्दल कोणाच्याही मनात शंका नाही आणि इथून पुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने आणखी एक जरी धाव काढली नाही, तरीही तो क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखला जाईल. तो एक असा खेळाडू आहे ज्याने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये प्रभुत्व मिळवले जे जवळजवळ कोणालाच जमले नाही. मात्र तरीदेखील याबाबत शंका नाही की जादूच्या कांडीप्रमाणे काम करणारी त्याची बॅट त्याला पहिल्यासारखी साथ देत नाही. हे लपलेले राहिले नसून हिट्सपेक्षा जास्त मिस आहेत. त्यामुळे विराटबाबत गोलंदाजांच्या मनात पहिल्यासारखी भीती उरली नाही."

आशिया चषकामध्ये विराट कोहलीने आतापर्यंत 14 डावांमध्ये एकूण 733 धावा केल्या आहेत. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा तिसरा भारतीय फलंदाज आहे. विराटने आपली शेवटची मालिका इंग्लंडविरूद्ध खेळली होती, ज्यामध्ये त्याला केवळ 1 अर्धशतकी खेळी करता आली होती. तेव्हापासून त्याला विश्रांती देण्यात आली आहे. 

आशिया चषकासाठी भारतीय संघ -
 रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हूड्डा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.  



 

Web Title: Akash Chopra says that bowlers are not afraid of Virat Kohli now like before

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.