मोठी बातमी : फ्रँचायझी क्रिकेटसाठी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

आगामी काळात फ्रँचायझी लीग या आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर भारी पडणार, असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 05:14 PM2023-08-04T17:14:04+5:302023-08-04T17:14:17+5:30

whatsapp join usJoin us
Alex Hales announces international retirement, T20 World Cup winner choosing to focus on career in franchise | मोठी बातमी : फ्रँचायझी क्रिकेटसाठी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

मोठी बातमी : फ्रँचायझी क्रिकेटसाठी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आगामी काळात फ्रँचायझी लीग या आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर भारी पडणार, असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता. फ्रँचायझी लीगमध्ये खेळण्यासाठी वेस्ट इंडिजचे अनेक खेळाडू जगभर फिरतात, परंतु त्यांना राष्ट्रीय कर्तव्यासाठी वेळ नसतो आणि आज त्यांच्या क्रिकेटची अवस्था कशी झालीय, हे आपण पाहतोच. त्यात आज इंग्लंडच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य ॲलेक्स हेल्सने वयाच्या ३४ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तत्काळ निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये MCG येथे पाकिस्तानवर पाच विकेटने विजय मिळवून इंग्लंडकडून शेवटचा सामना खेळला होता.  


हेल्स गेल्या नऊ महिन्यांपासून इंग्लंडच्या व्यवस्थापनाशी नियमित चर्चेत आहे आणि  राष्ट्रीय वचनबद्धता व फ्रँचायझी करार यांच्यातील समतोल साधत आहे. जगभरातील फ्रँचायझी लीगसाठी त्याच्या सतत उपलब्धतेची पुष्टी करून त्याने आंतरराष्ट्रीय खेळातून बाहेर पडण्याचा पर्याय निवडला आहे. हेल्स म्हणाला, “तिनही फॉरमॅटमध्ये १५६ वेळा माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हा एक विशेष आहे. मी काही आठवणी आणि काही मैत्री आयुष्यभर टिकवल्या आहेत आणि मला वाटते की आता पुढे जाण्याची योग्य वेळ आहे.  संपूर्ण प्रवासात इंग्लंडच्या शर्टमध्ये मी काही सर्वोच्च आणि काही सर्वात खालच्या स्तरांचा अनुभव घेतला आहे. हा एक अविश्वसनीय प्रवास आहे आणि मला खूप समाधान वाटते की इंग्लंडसाठी माझा शेवटचा सामना वर्ल्ड कप फायनल होता आणि जो आम्ही जिंकला होता."

Image
हेल्सने PSLमधील कराराची पूर्तता करण्यासाठी या वर्षाच्या सुरुवातीला बांगलादेशमधील इंग्लंडच्या ट्वेंटी-२० मालिकेतून माघार घेतली होती. त्यानंतर CPL फ्रँचायझीशी चर्चा करत असल्यामुळे त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या इंग्लंडच्या घरच्या ट्वेंटी-२० मालिकेतून बाहेर पडावे लागले असते.  त्याने ११ कसोटी सामन्यांत ५७३ धावा,     ७० वन डे सामन्यांत २४१९ धावा आणि ७५ ट्वेंटी-२० सामन्यांत २०७४ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ७ शतकं व ३१ अर्धशतकं आहेत. 

हेल्सने चार वर्षांपूर्वी इंग्लंडकडून शेवटचा वन डे सामना खेळला होता आणि भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा संघात समावेश होण्याची शक्यता कमीच आहे. पण, पुढच्या वर्षी कॅरेबियन व अमेरिका येथे होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघातील तो प्रबळ दावेदार होता. मात्र, त्याच्या निवृत्तीमुळे विल जॅक्स व फिल सॉल्ट या युवा खेळाडूंसाठी ट्वेंटी-२० संघातील संधी निर्माण झाली आहे.  
 

Web Title: Alex Hales announces international retirement, T20 World Cup winner choosing to focus on career in franchise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.