AUS vs ENG 1st T20I : Jos Buttler, अ‍ॅलेक्स हेल्स यांनी ऑसींना कुटून काढले; भारतीय खेळाडू मजा पाहायला पोहोचले, Video 

Australia vs England 1st T20I : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेला आजपासून सुरूवात झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 03:02 PM2022-10-09T15:02:17+5:302022-10-09T15:03:31+5:30

whatsapp join usJoin us
Alex Hales ends on 84 in 51 balls with 12 fours and 3 sixes, Jos Buttler scored 68 runs from just 32 balls, Indian players watching England vs Australia 1st T20 in Perth, Video  | AUS vs ENG 1st T20I : Jos Buttler, अ‍ॅलेक्स हेल्स यांनी ऑसींना कुटून काढले; भारतीय खेळाडू मजा पाहायला पोहोचले, Video 

Jos Buttler and Alex Hales

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Australia vs England 1st T20I : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेला आजपासून सुरूवात झाली. दुखापतीमुळे  मैदानाबाहेर असलेल्या जोस बटलरने ( Jos Buttler) आजच्या सामन्यातून पुनरागमन केले. त्याने पहिल्याच षटकात चार चौकार खेचून आपले मनसुबे स्पष्ट केले. त्याला अ‍ॅलेक्स हेल्स ( Alex Hales) ची तुल्यबळ साथ मिळाली आणि दोघांनी ११.२ षटकांत १३२ धावांची भागीदारी केली. बटलर व हेल्स ऑसी गोलंदाजांची धुलाई करत असताना भारतीय खेळाडू त्यांची मजा पाहण्यासाठी स्टेडियमवर पोहोचले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघाने त्यांचा मुक्काम पर्थमध्ये केला आहे आणि पर्थ स्टेडियमवरच AUS vs ENG मॅच सुरू आहे.

आज Deadline संपतेय! जसप्रीत बुमराहचा पर्याय BCCI ला जाहीर करावा लागेल अन्यथा... 


ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला अन् तो त्यांच्या अंगलट आला. बरेच दिवस हातात बॅट न घेतलेल्या बटलरने येताच धमाका सुरू केला. कॅमेरून ग्रीन, केन रिचर्डसन यांची त्याने धुलाई केली. बटलर व हेल्स यांनी ९व्या षटकांत शतकी टप्पा ओलांडला. बटलर ३२ चेंडूंत ६८ धावांवर बाद झाला. त्याने ८ चौकार व ४ षटकारांचा पाऊस पाडताना १२ चेंडूंत ५६ धावा कुटल्या. नॅथन एलिसने ही विकेट मिळवून दिली. त्यानंतर आलेल्या बेन स्टोक्सला ( ९) मोठी खेळी करता आली नाही आणि मार्कस स्टॉयनिसने त्याची विकेट घेतली.



हेल्स मात्र दमदार फटकेबाजी करत होता. त्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना हैराण करून सोडले होते. ५१ चेंडूंत १२ चौकार व ३ षटकार खेचून ८४ धावांची खेळी करणाऱ्या हेल्सचा सीमारेषेवर टीम डेव्हिडने झेल टिपला. केन रिचर्डसनने ही विकेट मिळवून दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Alex Hales ends on 84 in 51 balls with 12 fours and 3 sixes, Jos Buttler scored 68 runs from just 32 balls, Indian players watching England vs Australia 1st T20 in Perth, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.