Pakistan vs USA, Ali Khan: "आम्ही पाकिस्तानला परत हरवू..."; देश सोडून गेलेल्या अमेरिकन गोलंदाजाने पाकची लाज काढली

Pakistan vs USA, Ali Khan: अमेरिकन संघाने टी२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला केलं होतं पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 06:24 PM2024-09-11T18:24:12+5:302024-09-11T18:25:27+5:30

whatsapp join usJoin us
Ali Khan confident that USA can beat Pakistan in t20 again world cup 2024 heroic win | Pakistan vs USA, Ali Khan: "आम्ही पाकिस्तानला परत हरवू..."; देश सोडून गेलेल्या अमेरिकन गोलंदाजाने पाकची लाज काढली

Pakistan vs USA, Ali Khan: "आम्ही पाकिस्तानला परत हरवू..."; देश सोडून गेलेल्या अमेरिकन गोलंदाजाने पाकची लाज काढली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Pakistan vs USA, Ali Khan: पाकिस्तान क्रिकेट संघ गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झुंजत आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पाकिस्तानी संघ सातत्याने अपयशी ठरत आहे. घरच्या मालिकेतही बांगलादेशने त्यांचा दारुण पराभव केला आहे. याच दरम्यान अमेरिका (USA) क्रिकेट टीमचा गोलंदाज अली खानने पाकिस्तानला डिवचलं आहे. T20 World Cup 2024 मध्ये पाकिस्तानला पराभूत करणाऱ्या अमेरिकन संघात अली खानचा समावेश होता. तो आता पाकिस्तानबद्दल काय म्हणाला, जाणून घेऊया.

२०२४च्या टी२० विश्वचषकात पाकिस्तानला घोर अपमानाला सामोरे जावे लागले होते. या स्पर्धेत प्रथमच खेळणाऱ्या अमेरिकन संघाने पाकिस्तानला रडवले होते. दोन्ही संघांमधील सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला होता. त्यात अमेरिकेच्या संघाने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. या विजयात वेगवान गोलंदाज अली खानचे महत्त्वाचे योगदान होते. पाकिस्तानला याच पराभवाची आठवण करून देत, अली खान एका मुलाखतीत म्हणाला की, आम्ही पाकिस्तानला पुन्हा हरवू शकतो.

अली खान म्हणाला, "आम्ही पाकिस्तानला पुन्हा पराभूत करण्यास सक्षम आहोत. मला पाकिस्तानचा अनादर करायचा नाही, पण मला वाटते की आमचा संघ खरोखरच खूप चांगला आहे. ज्या-ज्या वेळी आमच्याकडे आमचा पूर्ण ताकदीचा संघ असेल त्यावेळी आम्ही नक्कीच कोणत्याही संघाला हरवू शकतो. जर आम्ही पुन्हा पाकिस्तानशी खेळलो तर आमच्यातील सामना नक्कीच अटीतटीचा असेल," असे तो म्हणाला.

टी२० विश्वचषकात पाकिस्तानचा अमेरिकेकडून झाला होता पराभव

पाकिस्तान-अमेरिका यांच्यात साखळी फेरीत सामना रंगला होता. त्यात पाकिस्तानने प्रथम २० षटकांत १५९ धावा केल्या होत्या. अमेरिकनेही २० षटकांत तीन गडी गमावून १५९ धावा केल्या. मग सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने प्रथम फलंदाजी करताना १८ धावा केल्या आणि पाकिस्तानला १३ धावांवर रोखत सामना जिंकला.

 

Web Title: Ali Khan confident that USA can beat Pakistan in t20 again world cup 2024 heroic win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.