नवी दिल्ली : भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमीला सोमवारी मोठा दिलासा मिळाला आहे. कौंटुंबिक हिंसाचार प्रकरणी शमीच्या नावानं अटक वॉरंट निघाला होता. मात्र, त्यावल स्थगिती मिळवण्यात शमीच्या वकिलांना यश आले आहे. कोलकाताच्या अलिपोर न्यायालयानं त्याच्या अटंक वॉरंटला स्थगिती दिली आहे.
आपल्याविरोधात अटक वॉरंट निघाल्यावर शमी वेस्ट इंडिजहून थेट अमेरिकेत गेला. शमीविरोधात 2 सप्टेंबरला अटक वॉरंट काढण्यात आले होते. त्यावेळी शमीला सरेंडर होण्यासाठी पंधरा दिवासांचा अवधी देण्यात आला होता. अटक वॉरंट निघाल्यावर शमी हा वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर होता. पण हा दौरा संपल्यावरही शमी भारतामध्ये परतलेला नाही. शमीला 17 सप्टेंबरपर्यंत न्यायालयापुढे हजर राहावे लागणार होते, परंतु त्याचे वकील सलीम रहमान यांनी त्यावर स्थगिती मिळवली आहे. सलीम यांनी आयएएनएसला सांगितले की,''शमीविरुद्ध उचललेले पाऊल हे न्यायालयीन प्रक्रियेचा भाग होता. त्याल सरेंडर होण्यास सांगण्यासारखे काहीच नव्हते.''
शमीवर त्याची पत्नी हसीन जहाँने कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप लावला आहे. याच प्रकरणी शमीला 15 दिवसांच्या आत सरेंडर होण्याचे आदेश देण्यात आले होते. शिवाय त्याला जामीनासाठी अर्जही करण्यास सांगितले गेले होते. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं आयएएनएसला सांगितले की,''शमी सध्या अमेरिकेमध्ये आहे. अमेरिकेमधून शमी कदाचित 11 सप्टेंबरला भारतासाठी रवाना होणार आहे. त्यानुसार शमी 12 सप्टेंबरला भारतात दाखल होऊ शकतो. या प्रकरणी तो सातत्यानं त्याच्या वकीलाशी चर्चा करत आहे.''
जहाँने पश्चिम बंगालच्या अलिपोर कोर्टात शमी आणि त्याच्या कुटुंबियांविरुद्ध घरगुती हिंसाचाराची केस दाखल केली. या नव्या केसमध्ये हसीन जहाँने शमीवर भत्ता आणि उपचाराचा खर्च न दिल्याचा आरोप केला. हसीन जहाँच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, हसीनने मोहम्मद शमी, त्याची आई, मोठा भाऊ आणि वहिनीविरोधात घरगुती हिंसाचाराची केस दाखल केली. तसेच हसीन जहाँने दर महिन्याला १० लाख रुपये भत्त्याची मागणी केली होती.
हसीनने ७ लाख रुपये कुटुंबाचा मेंटेनन्स आणि ३ लाख रुपये मुलीसाठी अशी १० लाखांची मागणी केली होती. केस दाखल केल्यानंतर हसीनने कोर्टात सादर झाला नसल्याचा आरोप केला. एप्रिल २०१९ मध्ये पतीच्या घरी जाऊन गोधळ घातल्याप्रकरणी हसीनला उत्तर प्रदेशातील अमरोही येथे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिची जामिनावर सुटका झाली होती.