- अयाझ मेमनक्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) वतीने गेल्या आठवड्यात सांगण्यात आले की, आॅक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणे सध्याच्या परिस्थितीमध्ये अशक्य आहे. यासह यंदाच्या वर्षी आयपीएल आयोजनाची शक्यताही बळावली. मात्र त्याचवेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मात्र अंतिम निर्णय दिलेला नाही. ‘सीए’चे चेअरमन अर्ल एडिंग यांनीही कबूल केले की, यंदा टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणे अशक्य आहे. कोरोनाची परिस्थिती सुधारण्यासाठी देशामध्ये सामाजिक अंतर राखण्यावर भर दिला जात असून, क्रीडा स्पर्धांमध्येही या नियमाचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत.सीए’ने १:४ या समीकरणाप्रमाणे ४० हजार प्रेक्षक क्षमतेच्या स्टेडियममध्ये केवळ १० हजार प्रेक्षकांना प्रवेश मिळेल, असे स्पष्ट केले. पण नक्कीच आपल्या यजमानपदाखाली क्रिकेटच्या सर्वांत लहान आणि लोकप्रिय प्रकाराची विश्वचषक स्पर्धा होत असताना इतक्या कमी प्रेक्षकांची उपस्थिती एडिंग यांना आवडणार नाही. सध्या आॅस्टेÑलियाला दोन समस्यांचा सामना करावा लागत आहे. पहिली समस्या म्हणजे त्यांना स्पर्धेत सहभागी होणाºया सर्व १६ संघांना क्वारंटाईन करावे लागेल. तसेच संपूर्ण देशासह या संघांची काळजी घेताना कोरोना प्रादुर्भावाचा धोकाही आहेच. एक किंवा दोन शहरांपुरतीच स्पर्धा मर्यादित केल्यास त्याचाही परिणाम दिसून येईल. आणि दुसरी समस्या म्हणजे आर्थिक नुकसान. प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्याबाबत अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाही. त्यात जर प्रेक्षकसंख्येवर निर्बंध आणले तर तिकीट विक्रीद्वारे मिळणारा नफा किमान ७५ टक्क्यांनी घटेल. केवळ टीव्ही प्रेक्षकांपुरते सामने खेळविणे ‘सीए’ आणि ‘आयसीसी’ दोघांनाही फायदेशीर ठरणार नाही.या सर्व परिस्थितीमध्ये पीसीबीच्या भूमिकेने लक्ष वेधले गेले. त्यांनीही ‘सीए’ला पाठिंबा देत यंदा टी-२० विश्वचषक आयोजन शक्य नसल्याचे सांगितले. गेल्याच आठवड्यात पीसीबीचे चेअरमन एहसान मनी यांनी ‘सीए’चे चेअरमन एडिंग यांच्या मताचे समर्थन केले. याचा अर्थ यंदाच्या आयपीएल आयोजनामधील एक अडथळा दूर होत असल्याची चिन्हे दिसत आहेत. मनी यांनी असेही सांगितले की, यंदाच्या वर्षाऐवजी आॅस्टेÑलियाला २०२२ सालच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद द्यावे. यामुळे एक शंका अशीही वाटते की, पीसीबी भारताला अनुकूल ठरतील अशा गोष्टींना पाठिंबा देत दोन्ही देशातील संबंध सुधारण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना? गेल्या अनेक वर्षांपासून भारत-पाकिस्तान मालिका खेळविण्याचा पीसीबीचा प्रयत्न आहे. भारतातील कोरोनाची परिस्थिती पुढील दोन-तीन महिन्यात सुधारेलच याबाबतही कोणतीच शाश्वती नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेणे, थोडे घाईचे ठरेल. शिवाय या सर्व गोंधळानंतरही आरोग्याच्या दृष्टीने आयपीएल खेळविण्यात आली नाही, तर? सध्याची परिस्थिती पाहता टी-२० विश्वचषक आणि आयपीएल यापैकी एक स्पर्धा होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यात यापैकी एकही स्पर्धा झाली नाही, तर आयसीसीच्या विश्वासार्हतेवरही शंका निर्माण होईल.।टी-२० विश्वचषक स्पर्धेचे प्रसारण हक्क मूल्य आयपीएलइतके नाही. सध्या ‘सीए’ आर्थिकरीत्या डगमगत असून अशा परिस्थितीमध्ये केविन रॉबटर््स यांनीही सीईओपदाचा राजीनामा दिला आहे. ‘सीए’च्या प्रशासनातही मोठ्या प्रमाणात नोकरकपात करण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे ‘सीए’ने मोठ्या प्रमाणात केलेली आर्थिक गुंतवणूक व्यर्थ ठरली. त्यामुळेच अशा परिस्थितीमध्ये विश्वचषक स्पर्धेऐवजी ‘सीए’ने पूर्ण लक्ष भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेवर दिले आहे. यातून त्यांना अधिक फायदा होण्याची शक्यता आहे.(कन्सल्टिंग एडिटर)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- आयसीसीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
आयसीसीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणे सध्याच्या परिस्थितीमध्ये अशक्य आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 1:53 AM